अकोला: जागतिक महिला दिन निमित्त प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीने दि ११ मार्च रोजी साय ६-३० वाजता स्थानीय जवाहर नगर परिसरातील राजे संभाजी पार्क मातृशक्ती सन्मान सोहळा आयोजित करण्यात आला आहे. या सोहळ्यात मराठी चित्रपट तारका किशोरी शहाने उपस्थित राहणार आहेत.
आ.धीरज लिंगाडे, प्रदेश युवक काँग्रेसचे उपाध्यक्ष शिवराज मोरे, प्रदेश युवक काँग्रेसच्या महासचिव शिवानी वडेट्टीवार आदींच्या उपस्थितीत संपन्न होणार्या या सोहळ्यात शून्यातून विश्व निर्माण करणार्या महिला तसेच विपरीत परिस्थितीवर मात करीत संसाराचा गाढा स्वतः ओढणार्या मातृशक्तीचा गौरव करण्यात येणार आहे.
या अभिनव उपक्रमात १०८ मातृशक्तींना साडी चोळी व स्मृतिचिन्ह प्रदान करून त्यांना सन्मानित करण्यात येणार असून त्यांचा आनंद द्विगुणित करण्यासाठी भव्य लकी ड्रा आयोजित करण्यात आला आहे. यात प्रथम पारितोषिक १ ग्राम सोन्याचे नाणे असून द्वितीय पुरस्कार ३० ग्राम चांदीचे नाणे व तृतीय पारितोषिक म्हणून २० ग्राम चांदीचे नाणे प्रदान करण्यात येणार असून विविध सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल राहणार आहे.
या सोहळ्यात मातृशक्तीनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संयोजक सागर कावरे, अंशुमन देशमुख,पंकज देशमुख,प्रवीण काळे,धीरज देशमुख, सुजय ढोरे,अंकुश भेंडेकर,भुषण चतरकर, अभय ताले,तुषार गावंडे ,रोहन पाटील,राहुल कावरे, संकेत तांदळे,विनीत काळमेघ,योगेश नागलवाडे,वैभव इंगोले आदींनी केले.