अकोला

मोफत धान्य वितरणाचे कमिशन द्या; रास्त भाव धान्य दुकानदार संघटनेची मागणी

अकोला: मोफत धान्य वितरणाचे कमिशन द्या, यासह अन्य मागण्यांसाठी अकोला जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन व गॅस परवानाधारक संघटनेतर्फे सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आले.

मागण्यांच्या समर्थनार्थ एकच मिशन आमचे कमिशन’, अशी घोषणा देण्यात आली. तसेच जानेवारी महिन्यापासून अंत्योदयची सारखरही मिळाली नसल्याचे संघटनेचे म्हणने आहे.आर्थिकदृष्ट्या कमकुवत असलेल्या नागरिकांना शासनाकडून सवलतीच्या दरात धान्याचे विवतरण करण्यात येते. विविध घटकांतील लाभार्थ्यांना शिधापत्रिकांचे वाटप करण्यात येते. दरम्यान जिल्हा रास्त भाव धान्य दुकानदार व केरोसीन व गॅस परवानाधारक संघटनेच्या अनेक मागण्या प्रलंबित आहेत.

Sinha-Hospital-Advt Akola
संपर्क 9356215876, 9011024745

यासाठी प्रशासनाशी चर्चाही करण्यात आली.मात्र तरीही मागण्या पूर्ण न झाल्यास संघटनेतर्फे २० मार्च रोजी धरणे आंदोलनाचे हत्यार उपसण्यात आले. जिल्हाधिकार्‍यांना विविध मागण्यांचे निवेदनही सादर करण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष महेश शर्मा, महानगराध्यक्ष योगेश अग्रवाल, सचिव अमोल सातपुते, मो. आरीफ, जयंत मोहोळ, कैलास गोळे, रमाकांत धनस्कार,आकाश वानखडे, शेख जावेद शेख रसूल, दिवाकर, पाटील, एस.व्ही. गुप्ता आदींसह गजानन मजदूर कामगार सहकारी संस्था, महिला शिवकला व उद्योग प्रशिक्षण, अकोला प्रâेन्डस सोसायटी आदींचे पदाधिकारी उपस्थित होते.