randhir-savarkar--borgaon-manju
अकोला

मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य- रणधीर सावरकर

बोरगाव मंजू : अकोला मूलभूत सुविधा उपलब्ध करून देणे कर्तव्य असून नागरिकांना पथदिवे पाणी उपलब्ध करून देण्यासाठी आपण सदैव तत्पर असून पंतप्रधान नरेंद्र मोदी अमृत योजनेच्या माध्यमातून घरघर स्वच्छ पाणी पोहोचवण्याचं काम करीत आहे केंद्र सरकार व राज्य सरकार व अकोला महानगरपालिकेच्या माध्यमातून व आपल्या स्थानिक विकास अंतर्गत अविकसित भागाचा विकास करण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन आमदार रणधीर सावरकर यांनी सांगितले.

मनोरथ कॉलनी डाबकी रोड या भागातील नागरिकांनी भेट घेऊन त्या भागामध्ये पाणी येत नसल्या बाबत व लाईट नसल्याबाबत . आ. रणधीरभाऊ सावरकर यांना कळविले. रणधीरभाऊंनी ताबडतोब निधी उपलब्ध करून या भागातील पाईपलाईन नव्याने जोडण्याचे काम व इले. पोलची व्यवस्था करुन दिली. व प्रत्यक्षात कामाला सुरुवात केली नागरिकांना उपलब्ध करून दिली नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करून कामाची सुरुवात करण्यात आली. यावेळी नगरसेविका सौ रंजनाताई विंचनकर, नगरसेवक श्री तुषारभाऊ भिरड, श्री शामभाऊ विंचनकर, श्रीमती माधुरीताई क्षीरसागर, श्री राहुलभाऊ धोटे, सुनीलभाऊ महल्ले, अनिलभाऊ चौधरी, तुषार तिकाईट धनंजय सदाशिव, अतुल पटुकले, सचिन आगरकर तसेच या भागातील चिंचोलकर, विद्याधर मिश्रा, डीक्कर, अनवाने, गद्रे, भडं, वानखडे, परभणीकर,काळे वाकोडे, वैभव गोडले, प्रशांत मिश्रा, रोहित, अक्षय, धामणीकर, पवन चंदेल व समस्त महिला भगिनी नागरिक उपस्थित होते.