अकोला

मूर्तिजापूर येथे जागतिक महिला दिन निमित्त महिला सन्मान सप्ताह सोहळा चे आयोजन

मूर्तिजापूर: स्थानिक भगवंत नगर येथील हॅपी कीड्स स्कूलमध्ये सामाजीक कार्यात अग्रेसर ज्ञान नर्मदा बहुउद्देशीय संस्थेचे संस्थापक तथा आपले मानव अधिकार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रमुख विष्णू लोडम यांच्या पुढाकाराने अखिल भारतीय महिला मराठा महासंघाच्या तालुकाध्यक्ष वनीता पाथरे,महिला पतंजली योग समितीच्या अकोला जिल्हा प्रभारी डॉ. स्वाती पोटे गायत्री परिवाराच्या करुणा घूमसे यांच्या विशेष प्रयत्नातून महिला सन्मान सोहळा सप्ताहाचे आयोजन करण्यात आले.

देवीचा गोंधळ भारुड भजन गायन रांगोळी स्पर्धा वक्तृत्व स्पर्धा विविध पदावर कार्यरत मान्यवर महिलांचा सन्मान अशाप्रकारे या कार्यक्रमांमध्ये सप्ताह भर विवीध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून माजी नगराध्यक्ष मोनाली गावंडे तथा प्रमुख अतिथी म्हणुन प्रा डॉ. माधुरी पाटील रुपाली तिडके सुनीता लोडम प्रा.मिना गावंडे प्रा.राजकन्या खणखणे उपस्थीत होत्या कार्यक्रमाची सुरुवात राजमाता राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊ यांच्या पूजनाने करण्यात आली.

यावेळी प्रा.खणखणे व माया दवंडे यांनी आपल्या गीत गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले महिलांच्या सर्वांगीण विकासासाठी जीवनामध्ये योगाचे महत्व या विषयावर विस्तृतपणे डॉ. स्वाती पोटे यांनी माहिती दिली यानंतर गाडगे महाराज विद्यालय येथील प्रा.मिना गावंडे ह्या सेवानिवृत्त झाल्याबाबत तथा ज्येष्ठ समाजसेविका वैजयंता डोंगरदीवे यांचा समाजकार्याबद्दल तसेच आपले मानव अधिकार फाउंडेशन महाराष्ट्र राज्य प्रमुख पदी नियुक्ती झाल्याबद्दल सामाजिक कार्यकर्ते विष्णू लोडम व कोरोना योद्धा म्हणून सारिका माकोडे यांचा विशेष सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाकरिता महिलांची उत्स्फूर्त उपस्थिती होती यावेळी प्रामुख्याने क्षमा इंगळे अनघा धामोरे प्रगती देवके चित्रा देशमुख पुष्पा जोगदंड ज्योती मोहकार वंदना सरोदे .चित्रा सरोदे सुनीता पाथरे वर्षा हांडे कविता साखरे साधना गावंडे राधा कावरे उज्वला डामरे सोनाली गाडबैल सारिका माकोडे प्रतिभा नवघरे संध्या वानखडे राजकन्या वानखडे उषा नागे आशा लहाने चंदा डिके उज्वला सवाईकर विमल सरोदे जया इंगळे इत्यादी महिला उपस्थित होत्या कार्यक्रमाचे बहारदार संचालन अखिल भारतीय महिला मराठा महासंघ तालुकाध्यक्ष वनिता पाथरे यांनी तर आभार डॉ. स्वाती पोटे यांनी मानले कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अ.भा.मराठा महिला महासंघ पतंजली योग समिती गायत्री परिवार व हॅपी वुमन्स च्या महिला सदस्यांनी परिश्रम घेतले