मुर्तिजापूर: मूर्तिजापूर मतदार संघाच्या विकासासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर झाल्याने आमदार हरीश पिंपळे यांच्या मागणीला यश आले आहे. मतदारसंघाच्या विकासासाठी कटिबद्ध असलेले आमदार हरीश पिंपळे यांनी २७ कोटी रुपयांचा मुख्यमंत्री ग्राम सडक योजना आशियाई विकास बँक एडीबी अर्थसहाय्य अंतर्गत जिल्ह्यातील मूर्तिजापूर मतदारसंघात रस्त्यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये हा निधी मंजूर केला आहे. पालकमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी
मुख्यमंत्री ग्रामसडक योजना टप्पा क्रमांक दोन आशियाई विकास बँक एटीबी अर्थसहाय्य अंतर्गत रस्त्याची सुधारणा होते. करण्याकरिता शासनाची मान्यता प्राप्त करून घेतली आहे. तसेच बार्शीटाकळी पॅकेज एडीबी राष्ट्रीय महामार्ग २७४ ते पाटखेड रस्ता लांबी किमी ७२०० किंमत पाच कोटी ६० लाख ४० हजार
रुपये राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २७३ महागाव, राजनखेड रस्ता ७ कोटी ४१ लाख ७६ हजार रुपये मूर्तिजापूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा अनभोरा, भगोरा, ते दुधलम, कवठा ते पातूर नंदापूर रस्ता १४ कोटी ४ लाख ८ हजार रुपये मंजूर झाले आहे. मागील अनेक महिन्यांपासून आमदार हरीश पिंपळे या भागातील परिसराचा दौरा करून समस्या जाणून घेत आपल्या परीने मतदारसंघाच्या विकासासाठी करोडो रुपये निधी खेचून आणला आहे. तातडीने या कामाला सुरुवात होणार असल्याची माहिती भाजपा शहर उपाध्यक्ष कोमल तायडे यांनी दिली.