क्राईम

मूर्तिजापूरातून १६किलो गांजासह एकास अटक! अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या पथकाची कारवाई!

मुर्तिजापूर१सप्टेंबर:-अकोला जिल्हा पोलीस अधीक्षक यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांनी मूर्तिजापूरातून १६किलो गांजासह एका आरोपीला रिक्षासहीत अटक केली.एवढया मोठ्या प्रमाणात गांजा पकडल्याने,अवैध मादक पदार्थांची विक्री करणाऱ्या मध्ये खळबळ उडाली आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अकोला जिल्हा अधिक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाचे प्रमुख विलास पाटील यांना१सप्टेंबर रोजी,अमरावती वरून तीन चाकी रिक्षाने मूर्तिजापूर कडे मोठ्या प्रमाणात गांजा येत असल्याची गोपनीय माहिती मिळाली,त्या माहितीच्या आधारे मूर्तिजापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीत राष्ट्रीय महामार्गावर नाका बंदी करण्यात आली, नाकाबंदी दरम्यान अमरावतीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षा क्रमांक एम.एच.३०-बी.डब्ल्यू.५१७१ ची थांबवून झडती घेतली असता,रिक्षा मधील प्लास्टिकच्या पिशवीत१लाख६० हजार रुपये किंमतीचा१६किलो मिळुन आला, त्यावरून रिक्षाचालक शे.असिफ शे.युसुफ, वय २९वर्षे, रा.रहेमत नगर अमरावती, याला अटक करण्यात आली,त्याच प्रमाणे नमूद रिक्षा आणि एक१०हजार रुपये किंमतीचा मोबाईल सुद्दा जप्त करण्यात आला असून,या कारवाईत ३लाख७०हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. शे.असिफ शे.युसुफ याच्या विरोधात एनपीडिएस कायदा कलम २० (ब) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून,पुढील कारवाई साठी नमूद आरोपीला मूर्तिजापूर पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे. ही कारवाई जिल्हा पोलिस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार, पोलिस निरीक्षक विलास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांच्या पथकाने केली.