क्राईम

मुलगी झाल्याच्या रागातून पत्नीचा खून!पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील घटना:-

पुणे२९ऑगस्ट:-पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यात येत असलेल्या चांदखेड गावात, एका विवाहित महिलेला मुलगी झाल्याचा रागातून, तिच्या पतीने तीची गळा दाबून हत्त्या केल्याची हृदयद्रावक घटना घडली. चांगुणा योगेश जाधव,वय २०वर्षे, रा.चांदखेड, ता.मावळ जिल्हा पुणे असे खून करण्यात आलेल्या महिलेचे नांव आहे.ही घटना २८ऑगस्टच्या रात्री घडली असून,२९ऑगस्टच्या सकाळी ही घटना उघडकीस आली. याबाबत मृतक महिलेचे वडील शवाजी दामू ठाकर,वय ४३वर्षे, रा.ठाकरवाडी(पंदरवाडी) ता.मावळ जिल्हा पुणे,यांनी तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरू, तळेगाव पोलिसांनी खुनाचा गुन्हा दाखल करून,आरोपी पती योगेशला अटक केली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की,पती योगेश आणि पत्नी चांगुणा हे चंदनवाडी येथे राहत होते. यापूर्वी सुद्धा चांगुणाला पहिली मुलगी झाली असल्याच्या कारणावरून पती योगेश हा चांगुणाला मारहान करायचा, आणि तुला मुलगा का होत नाही, या कारणावरून शारीरिक व मानसिक छळ करायचा, असे चांगुणाच्या वडिलांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.२८ऑगस्ट शुक्रवारी रात्री ८वाजता दरम्यान पती योगेश कैलास जाधव याने ,चांगुणा झोपली असता,योगेशने झोपेतच तिचा गळा दाबून खुनकेला.हा प्रकार शनिवारी सकाळी उघड झाल्यावर, पोलिसांनी साडे आठ वाजताच्या दरम्यान योगेशला अटक केली. या खून प्रकरणाचा तपास पोलीस उपनिरीक्षक गाडीलकर पुढील तपास करीत आहेत.