ambadas-danve
राजकीय

मुख्यमंत्र्यांविरोधात हक्कभंगाचा प्रस्ताव आणावा : अंबादास दानवेंची 

मुंबई : ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या वक्तव्या विरोधात विधानसभेत हक्कभंगाचा प्रस्ताव आणल्यानंतर आता विरोधकही आक्रमक झाले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या देशद्रोही या वक्तव्याप्रकरणी त्यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्तावा आणावा अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी विधान परिषद उपसभापती नीलम गो-हे यांना पत्राद्वारे केली आहे.त्यामुळे सत्ताधारी विरूध्द विरोधक असा सामना रंगल्याचे दिसून येतय.

रविवार, दिनांक २६ फेब्रुवारी, २०२३ रोजी शासनाने आयोजित केलेल्या चहापानाच्या कार्यक्रमास विरोधी पक्षांनी शेतकरी, विद्यार्थ्याचे प्रश्न, कायदा व सुव्यवस्थेचा उडालेला बोजवारा या विषयावरून बहिष्कार घातला होता. या अनुषंगाने मुख्यमंत्री महोदयांनी पत्रकार परिषदेत देशद्रोह्यांबरोबर चहापान टळले असे वक्तव्य केले आहे. राज्याच्या प्रमुख पदी असलेल्या लोकप्रतिनिधींनी अशा हीन भाषेचा वापर केल्यामुळे विरोधी पक्षनेता, महाराष्ट्र विधानपरिषद म्हणून माझा व सार्वभौम सभागृहाचा विशेषाधिकार भंग व अवमान झाला आहे असे आंबादास दानवे यांनी पत्रात म्हटलं आहे.