मुंबई

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेकडून औरंगाबाद आणि उस्मानाबाद शहराच्या नामकरणाला स्थगिती!

मुंबई, 15 जुलै: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कडून  औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती देऊन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना आणखी एक धक्का दिला आहे.

मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.

दरम्यान नामांतराच्या निर्णयावर स्थगिती दिल्यानंतर शरद पवार यांनी राज्य सरकारलाच यासंबधी विचारावं लागेल असं म्हटलं आहे.शरद पवार आज नागपुरात असून हॉटेलबाहेर त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.

यावेळी त्यांना नामांतरणाच्या निर्णयाला स्थगिती देण्यासंबंधी विचारण्यात आलं असता ‘ते आता राज्य सरकारलाच विचारा’ असं सांगत त्यांनी जास्त भाष्य करणं टाळलं.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी औरंगाबादचे संभाजीनगर आणि उस्मानाबादचे धाराशिव नामकरण करण्याच्या महाविकास आघाडी सरकारच्या निर्णयाला स्थगिती दिली आहे. मुख्यमंत्रिपदावरून पायउतार होताना उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने घेतलेले सर्व निर्णय रोखण्याचे आदेश नव्या सरकारने दिले असून, मुख्यमंत्री या सर्व निर्णयांचा फेरआढावा घेणार आहेत.