BJP-Shivsena
ताज्या बातम्या मुंबई

मुंबईत सहा लोकसभा क्षेत्रात भाजप सेनेची आशीर्वाद यात्रा

मुंबई: मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात रविवार ५ मार्चपासून भाजप शिवसेनेची आशीर्वाद यात्रा सुरू होत असल्याची माहिती मुंबई भाजपा अध्यक्ष आमदार अँड आशिष शेलार यांनी आज येथे दिली.

स्वर्गीय हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि शिवसेना हा पक्ष मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे घेवुन जात आहेत. भाजपा आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह असून याच अनुषंगाने भाजपा आणि शिवसेना यांच्यावतीने मुंबईतील सहा लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा रविवारी (ता. ५) मार्च पासून सुरू होत आहे. दीड दोन तासांचा प्रवास करून प्रत्येक लोकसभेतील एका पावन प्रसिद्ध मंदिरात दर्शन घेऊन यात्रा पुढे जाईल. अश्या सहा यात्रा संपन्न होतील अशी माहिती भाजपा नेते आ. ॲड. आशिष शेलार यांनी शनिवारी पत्रकार परिषदेत दिली.
५ मार्च, ९ आणि ११ मार्च रोजी प्रत्येकी दोन लोकसभा क्षेत्रात आशीर्वाद यात्रा होईल. त्यानंतर १४ मार्चला दादर येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन चरित्रावर आधारित ‘जाणता राजा’ महानाट्य होईल असेही शेलार यांनी सांगितले.