क्राईम

मुंबईत बिल्डरची गोळ्या झाडून हत्त्या!

बांधकाम व्यावसायिकां मध्ये चिंतेचे वातावरण!

मुंबई 15 मार्च:-देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत खुलेआम बांधकाम व्यावसायिकावर भरदिवसा गोळ्या झाडून हत्त्या करण्यात आले आहे.सावजी पटेल असे हत्या करण्यात आलेल्या बांधकाम व्यावसायिकाचे नांव असून, या घटनेमुळे बांधकाम व्यावसायिकां मध्ये चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.

ही घटना नवी मुंबईतील नेरुळ येथे घडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार नेरूळ येथे सावजी पटेल हे आपल्या चारचाकी मधून जात असताना , मोटारसायकल वरून आलेल्या दोघांनी त्यांच्या कडे असलेल्या रिव्हॉल्व्हर मधून सावजी पटेल यांच्यावर तीन गोळ्या झाडल्या.

गोळ्या त्यांच्या छातीत आणि पोटात लागल्या. त्यामुळे पटेल हे जागेवरच गतप्राण झाले. व्यावसायिक वादातून ही हत्या झाल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे. वृत्त लिहोस्तर या हल्ल्यामागील कारण समोर आले नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

खुलेआम गोळीबार होत असताना भयभीत झालेल्या उपस्थिनांनी घटनेची माहिती पोलीस नियंत्रण कक्षाला दिल्यावरुन घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पोलीस घटनास्थळी दाखल झाले., हल्लेखोर गोळीबार करून दुचाकीने पळून गेले असल्याने पोलीस अज्ञात मारेकरांचा शोध घेत असल्याची माहिती नवी मुंबई पोलीस उपआयुक्त अमित गुन्हे शाखेचे उपायुक्त अमित काळे यांनी दिली.

आजच्या या हल्ल्यामुळे पोलीस यंत्रणा देखील सतर्क झाली असून,बांधकाम व्यावसायिक यांच्या मध्ये भीतीचं वातावरण निर्माण झाले आहे.घटना स्थळावरून फायर करण्यात आलेल्या तीन काडतुसाचा मागील भाग ताब्यात घेण्यात आला असून, मारेकरांचा पोलीस युध्द पातळलीवर घेत आहेत.