महाराष्ट्र

मुंबईत उड्डाणपूल बांधकाम सुरू असल्या दरम्यान कोसळला!

दुर्घटनेत १४ जण गंभीर जखमी,पुलाच्या मलब्याखाली आणखी काही जण अडकल्याची शक्यता

मुंंबई १७ सप्टेंबर:- मुंबईतील मुख्यमंत्री उद्धव ठाकारे यांच्या मातोश्री निवासस्थाना पासून अगदी जवळ असलेल्या बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स परिसरात मेट्रोचा बांधकाम सुरु असलेला फ्लायओव्हर पहाटे चार वाजता दरम्यान कोसळला असल्याची घटना घडली आहे. या अपघातात १४ जण जखमी झाले असून, २१ जणांना वाचविण्यात यश आले हे. जखमींना सांताक्रुझच्या व्ही एन देसाई रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता आहे.या दुर्घटनेत जखमी असलेले हे सर्वजण कामगार असल्याची माहिती आहे. या घटनेत अद्याप जीवितहानी झालेली नाही. अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने बचावकार्य सुरु केल्याने २१ जणांचे प्राण वाचले आहेत. दुर्घटना घडली तेव्हा कामगार पुलाच्या वर आणि खाली काम करत होते.दुर्घटना घडल्यानंतर पुलाच्या वर काम करत असलेल्या कामगारांनी जीव वाचवण्याचे प्रयत्न केले. काही जणांनी सळयांचा आधार घेतला तर काही जणांनी पुलावरुन उडी मारुन जीव वाचवण्याचा प्रयत्न केला.अनिल सिंग, अरविंद सिंग, अझर अली, मुस्ताफ अली, रियाझुद्दीन, मोतलाब अली, रियाझू अली, श्रावण, अतीश अली, रलिस अली, अझिझ उल हक, परवेझ, अकबर अली, श्रीमंद अशी या घटनेत जखमी झालेल्यांची नावे आहेत.हा पुल कसा कोसळला,या संदर्भात चौकशी करण्याची मागणी करण्यात येत असून, कंत्राटदार कंपनीवर कारवाई करण्याची मागणी, जखमीच्या नातेवाईकांनी केली आहे.