क्राईम

मुंबईतुन आणखी एका दहशतवाद्याला अटक!

मुंबई१८सप्टेंबर:-मुंबई दहशतवादी पथकाने आणखी एका संशयित दहशतवाद्याला, मुंबई मधील जोगेश्वरी भागातून अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या दहशतवावाद्याचे दिल्लीतुन अटक करण्यात आलेल्या, दहशतवाद्याशी कनेक्शन असल्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. ही कारवाई मुंबई गुन्हेशाखेच्या आणि दहशतवादी विरोधी पथकाच्या चमूने १७सप्टेंबर रोजी रात्री केली आहे. अटक करण्यात आलेल्या संशयित दहशतवावाद्याचे संबंध डी गॅंग सोबत असल्याची माहिती समोर येत आहे.तो जॉन मोहम्मदचा हस्तक असल्याचा पोलिसांचा अंदाज आहे.