Soyabean-cotton
अकोला

मिळेल त्या भावात सोयाबीन, कपाशीची शेतकर्‍यांकडून विक्रा

अकोला: जिल्ह्यात गेल्या काही दिवसांत अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये सोयाबीनची आवक मोठ्या प्रमाणात वाढली आहे. गुरुवारी दिवसभरात ५ हजार क्विंटलहून अधिक आवक झाली. मात्र अद्यापही समाधानकारक भाव मिळत नसल्याने अनेक शेतकर्‍यांनी सोयाबीन राखून ठेवले आहे.

अकोला बाजार समितीमध्ये २३ फेब्रुवारीला कमीत कमी ४५००, जास्तीत जास्त ५६१५ तर सरासरी ५१००रुपये भाव मिळाला. दुपारपर्यंत ५४५० क्विंटल मालाची आवक झाली.२२ तारखेलाही ५ हजार क्विंटलहून अधिक आवक झाली. तर सरासरी भाव ५१५० रुपये होता.

मात्र गरजेपोटी शेतकरी सोयाबीन बाजारात आणत आहेत. दुसरीकडे गेल्या वर्षी कपाशीला १० ते १२ हजार रुपये क्विंटलहून अधिक भाव मिळाला होता. यंदाही त्याच प्रतीक्षेत शेतकर्‍यांनी कापूस राखून ठेवला आहे. मात्र भाववाढीचे संकेत कमी असल्याचे व्यापार्‍यांकडून सांगण्यात येते.