क्राईम

मालेगांव(वाशिम) दरोड्याचे कनेक्शन अकोटात!

अकोला प्रतिनिधी:-२७डिसेंबर वाशिम जिल्ह्यातील मालेगांव येथे २१ डिसेंबरच्या  रात्री दरम्यान भरवस्तीत पडलेल्या दरोड्याचे अकोला जिल्ह्यातील अकोट येथे कनेक्शन असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे. या प्रकरणी अकोट येथील रहिवासी असलेला दुसरा मुख्य आरोपी हसन सलीम खाटीक याला अटक करण्यात आली आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की,सशस्त्र दरोडा प्रकरणत आणखी तीन आरोपी ताब्यात.दिनांक 21 डिसेंबर 2021 रोजी संध्याकाळी 9 वाजताच्या सुमारास  मालेगाव शहरातील अंजनकर ज्वेलर्सचे मालक योगेश अंजनकर व त्यांचे सहकारी रवी वाळेकर यांचे चाकूने हल्ला करून खून केल्याप्रकरणी तपासातील पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अजय महल्ले व सहकाऱ्यांनी मुख्य आरोपी अजबराव घुगे यास दि 25 डिसेंबर 2021 रोजी  अटक केल्यानंतर जिल्हा पोलीस अधीक्षक  बच्चन सिंह यांचे मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा वाशिम व पोलीस स्टेशन मालेगाव यांचे चार वेगवेगळी पथके तयार  करून तपास कामी रवाना करण्यात आलेली होती.यातील दुसरा मुख्य आरोपी हसन  सलीम खाटीक रा. अकोट यास तपास पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक रामकिसन जायभाये, पोहेकाॅ. गजानन झगरे, अमोल पाटील, सुधीर सोळंके यांच्या पथकाने मध्यरात्री धुळे जिल्ह्यातून ताब्यात घेण्यात आलेले असून अटक करण्यात आलेली आहे. तीसरा आरोपी दिनेश किरण नीरापुरे, यास अहमदाबाद  गुजरात येथून  ताब्यात घेतले. तर यामधील  चौथा आरोपी गुजरात राज्यातुन सराईत गुन्हेगार असलेला संतोष उर्फ संत्या दत्तात्रय माने रा. पाल, तालुका कराड, जिल्हा सातारा येथून तपासातील पथक प्रमुख पोलीस उपनिरीक्षक अजय महल्ले व सहकार्यांनी ताब्यात घेवून अटक केली आहे.ताब्यात  घेण्यात आलेल्या आरोपींचे  प्रत्येकाचा  कशाप्रकारे सहभाग आहे.  याचा तपास करून या सर्व आरोपींनी कशाप्रकारे व कोणत्या ठिकाणी कट रचून सदरचा सशस्त्र खूनी दरोडा  टाकला तसेच गुन्ह्यात वापरण्यात आलेली हत्यारे सुद्धा कोणत्या ठिकाणावरून कोणत्या वाहनाने तसेच कोणाकडून आणले याचा सुद्धा तपास करून सदर दरोड्यात प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष सामील असलेल्या सर्व आरोपींच्या विरुद्ध  कठोर कारवाई  करण्यात येणार असल्याचे मालेगाव चे पोलीस निरीक्षक अरविंद धुमाळ यांनी बोलताना सांगितले.सदर गुन्ह्याचा तपास भामरे अपर पोलीस अधीक्षक वाशिम, सुनिल पुजारी उपविभागीय पोलिस अधिकारी, वाशिम यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास मालेगाव पोलिस करीत आहे.

अकोट शहर हे मध्यप्रदेशच्या सीमेला लागून असल्याने, या ठिकाणी यापूर्वीही मध्यप्रदेशातील शस्त्र तस्करीच्या घटना उघडकीस आल्या आहेत.मालेगांव येथे टाकलेल्या दरोडा आणि खून प्रकरणात दोन देशी कट्ट्यासह जिवंत काडतुसे जप्त केल्याने,या दरोड्यातील मुख्य आरोपी हसन खाटीक याची बहीण, मालेगाव तालुक्यातील राजुरा(राव) येथे असल्याने खाटीक याचा संपर्क यातील मुख्य आरोपी अजाबराव घुगे याच्याशी आला होता. हे येथे उल्लेखनीय आहे.