मुरादाबादः९सप्टेंबर:- कुस्तीच्या स्पर्धाचे आयोजन करण्यासाठी,कोणत्याही प्रकारची कायदेशीर परवानगी न घेता, कुस्तीच्या मैदानात, कुस्ती सुरू असतांना एका पहिलवाणाने दुसऱ्या पैलवानाला धोबी पछाड देऊन,काही सेकंदात जमिनीवर चित करीत असतांना मान मुरडली असल्याने, पैलवानाचा मैदानावरच तडफडून मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना घडली.महेश असे मृत्यू झालेल्या पहिलवाणाचे नांव असून,ज्या पाहिलवानाच्या हातून ही घटना घडली,त्याचे साजिद अन्सारी असे नांव आहे.या प्रकरणातील थोडक्यात हकीकत अशी आहे की,फरीदनगर गावात २ सप्टेंबरला कुस्ती स्पर्धा भरवण्यात आली होती. या स्पर्धेसाठी नौमी मेला कमिटीने कोणाचीही परवानगी घेतली नव्हती. तसंच कुणी प्रशिक्षकही नव्हता. विशेष म्हणजे माती कुस्तीसाठी आवश्यक असलेली मातीही तयार केली नव्हती.उत्तराखंडमधील काशीपूरच्या गंगानगर गावातील एक पैलवान महेश या कुस्ती स्पर्धात सहभागी होण्यासाठी आला होता. त्याचा सामना पैलवान साजिद अन्सारी याच्याशी सुरू होता. यावेळी साजिदने महेशला उचलून डोक्यावर जमिनीवर आपटवलं. यात महेशच्या मानेला जबर झटका बसला आणि तो तिथेच कोसळला.महेश याची मान मुरगळल्याने तो जमिनीवर पडलेला होता. दुसरीकडे पैलवान साजिद जिंकल्याने अनेक जण टाळ्या वाजवत होते. पण महेशला उपचारासाठी हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं नाही. अनेक जण त्याची मान नीट करताना दिसले. पण त्याला त्वरीत उपचार न मिळाल्याने त्याचा तडफडून थितेच मृत्यू झाला.कुस्ती आयोजक मंडळाने हे प्रकरण आपसात मिटविण्यासाठी६०हजार रुपये मृतक पहेलवान महेश याच्या कुटुंबियांना दिले होते.परंतु या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने,याची दखल या विभागाचे अप्पर पोलीस अधीक्षक विद्यासागर मिश्र यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत.
- .