मुंबई

माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या पतीचे निधन

टीम, दैनिक राज्योन्नती
मुंबई : भारताच्या पहिल्या महिला माजी राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांचे पती देवीसिंह शेखावत यांचे निधन झालं आहे. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात शेखावत यांनी शुक्रवारी सकाळी ९.३० मिनिटांनी अखेरचा श्वास घेतला.

माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून देवीसिंह शेखावत आजारी होते. तसेच त्यांना हृदयविकाराचा झटकाही आला होता. त्यामुळे शेखावत यांच्यावर पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. पण यावेळी त्यांची प्रकृती काही त्यांना साथ देत नव्हती, आधिकाधिक खालावत चालली होती. उपचारादरम्यान शुक्रवारी सकाळी ९.३० वाजता शेखावत यांची प्राणज्योत मालवली. वयाच्या ८९व्या वर्षी त्यांनी अखेर श्वास घेतला. शुक्रवारी सायंकाळी ६ वाजता पुण्यातच त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार असल्याची माहित मिळत आहे.

प्रतिभाताई पाटील आणि देवीसिंह शेखावत यांचा विवाह ७ जुलै १९६५ रोजी झाला होता. शेखावत हे शिक्षण क्षेत्रात खूप सक्रिय होते. १९७२ साली त्यांनी मुंबई विद्यापिठातून पीएचडी केली होती.