ayurveda
अकोला

महिला दिनावर आयुर्वेद महाविद्यालयात महिला वर्गासाठी रोगनिदान शिबिराचे आयोजन

अकोला: शैक्षणिक दृष्ट्या आयुर्वेदाचा प्रसार व प्रसार करणार्‍या स्थानीय जठारपेठ रोड वरील रा.तो. आयुर्वेद महाविद्यालयात जागतिक महिला दिनावर मोफत आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

बुधवार दिनांक ८ मार्च रोजी सकाळी ९ वाजता आयोजित या मोफत शिबिरात तज्ञ वैद्यकीय वर्ग महिलांची आरोग्य तपासणी करणार आहेत. महिलांमध्ये वाढते स्तन व गर्भाशय कर्करोगाचे प्रमाण बघता यात गर्भाशय मुख व स्तन कर्करोग तपासणी ही करण्यात येणार आहे.

राष्ट्रीय वैद्यक प्रसारक मंडळचे अध्यक्ष अरूण दामले, सचिव डॉ किशोर पिंपरकर,रा तो आयुर्वेद महाविद्यालयाचे डॉ समाधान कंकाळ यांच्या मार्गदर्शनात आयोजित या मोफत शिबिराचा महिलांनी लाभ घेण्यासाठी डॉ. मुक्ता ९४ २० ३३९१७२ तथा डॉ. निकिता ९१ ७२ ८३१११२ यावर संपर्क करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.