अर्थ मुंबई

महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी सशक्ती डिजिटल व्हॅन

मुंबई, दि. २५ : महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी कौशल्य विकास विभागामार्फत मास्टरकार्ड अँड लर्निंग लींक्स फाउंडेशन यांच्यामार्फत सीएससी यांच्या सहयोगाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने राज्याचे कौशल्य विकास आणि महिला व बालविकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांच्या हस्ते ‘ व्हॅन’चा शुभारंभ करण्यात आला. 

या उपक्रमांतर्गत येत्या ३१ मार्चपर्यंत सुमारे ७ हजार ५०० महिलांपर्यंत पोहोचून त्यांना उद्योजकतेसंदर्भात माहिती देण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई महानगर क्षेत्रातील मुंबई, ठाणे, पालघर आणि रायगड जिल्हा तसेच पुणे जिल्ह्यातील पुणे आणि पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्रामध्ये हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. असे लोढा यांनी यावेळी सांगितले. याप्रसंगी मास्टर कार्डचे संचालक रोहन सिरकर, लर्निंग लिंक्स फाउंडेशनचे व्यवस्थापकीय सल्लागार मोहम्मद अमीर एजाज, जनकल्याण सहकारी बँकेचे अध्यक्ष संतोष केळकर, बँकेचे व्यवस्थापक मिलिंद देसाई, सीएससी महाराष्ट्रचे सहाय्यक महाव्यवस्थापक धवल जाधव, माजी नगरसेवक अभिजीत सावंत, सामाजिक कार्यकर्ते विनोद दुबे, सशक्ती टीमचे चंद्रकांत अहिरे, सनम शेख आदी मान्यवर उपस्थित होते.