आतंकवादी बनण्यासाठी निघालेल्या दोघांना पोलिसांना घेतले ताब्यात
मुंबई: दिल्ली पोलिसांनी लाल किल्ल्याजवळ दोन कट्टरपंथी तरुणांना अटक केली आहे. हे दोन्ही दहशतवादी प्रशिक्षणासाठी काश्मीरमार्गे पाकिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात होते. खालिद आणि अब्दुल्ला अशी या दोघांची नावे आहेत.
यापैकी एक तामिळनाडू आणि दुसरा महाराष्ट्रातील आहे. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत.पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हे दोन तरुण दहशतवादी प्रशिक्षणासाठी पाकिस्तानात जात होते. माहिती मिळताच त्यांना अटक करण्यात आली आहे. लाल किल्ल्याजवळून दोघांना अटक करण्यात आली आहे.
खालिद आणि अब्दुल्ला काश्मीरमार्गे पाकिस्तानात जाण्याच्या प्रयत्नात होते. ते लाल किल्ल्याजवळ येणार याची अचूक माहिती मिळाल्यावर त्यांना अटक करण्यात आली. त्यांच्याकडून शस्त्रेही जप्त करण्यात आली आहेत. त्यांची चौकशी असून या चौकशीत अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.