अकोला

महाराणा प्रताप जयंतीनिमित्त भव्य शोभायात्रा

महाराणा प्रताप सेवा समितीचे आयोजन

अकोला  : हिंदू सूर्य महाराणा प्रताप यांच्या तिथीनुसार जयंतीनिमित्त गुरुवारी 2 जून रोजी सायंकाळी भव्य शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत समाजातील शेकडो महिला – पुरुषांचा पारंपारिक वेशभूषेत समावेश होता .

ढोल – ताशांच्या गजरात सदर शोभायात्रा काढण्यात आली. या शोभायात्रेत महाराणा प्रताप सेवा समितीचे पदाधिकारी , कार्यकर्ते , सदस्य व समाज बांधव मोठ्या संख्येने होते.

स्थानिक महाराणा प्रताप बाग येथून सदर शोभयात्रेला प्रारंभ करण्यात आला. तेथून चित्रा टॉकीज , वसंत टॉकीज समोरून , पूनम ज्वेलर्स, गांधी चौक ते पुन्हा महाराणा प्रताप बाग येथे सदर शोभायात्रेचा समारोप करण्यात आला.

त्यानंतर महाप्रसादाचे आयोजन सुद्धा करण्यात आले होते. सर्वप्रथम वसंत टॉकीज समोर ज्येष्ठ आमदार गोवर्धन शर्मा यांच्या वतीने सदर शोभायात्रेचे स्वागत करण्यात आले. सदर मिरवणुकीत गांधी चौक येथे झाकी ठेवण्यात आली होती. सोबतच या ठिकाणी शोभायात्रेचे स्वागत सुद्धा करण्यात आले. सदर मिरवणुकीत महिला, युवतींचा सहभाग मोठ्या प्रमाणात होता.

दरवर्षी प्रमाणे उदयसिंह ठाकूर गुलाबबाबा बँड यांच्या वतीने बँडचे सहकार्य लाभले. यावेळी महाराणा प्रताप सेवा समितीचे अध्यक्ष विजयसिंग तवर, अखिल भारतीय क्षत्रिय महासभा जिल्हाध्यक्ष पृथ्वीराजसिंह ठाकूर , शहर अध्यक्ष रघु ठाकूर, संजयसिंह ठाकूर जानकी सिड्स, अजयसिंह परमार , प्रदीपसिंग गौर, बादलसिंग ठाकूर, एड. सुभाष ठाकूर , राजेंद्र सिंह ठाकूर (केळीवेळी), मुन्ना उर्फ मंगलसिंह ठाकूर, भोजराज सिंग ठाकूर बैस, एड. चेतनसिंह ठाकूर, लक्ष्मणसिंह चौहान, ब्रिजमोहनसिंह ठाकूर बाळापूर, विजयसिंग चौहान, विजय ठाकूर, चंदनसिंह ठाकूर, मोहनसिंह रघुवंशी, प्रतापसिंह सिसोदिया, ऍड. दुष्यंतसिंह ठाकूर, आकाश ठाकूर , संदीप ठाकूर, राजकमल ठाकूर, किशोरसिंह ठाकूर , महेंद्र सिंह ठाकूर (केळीवेळी), प्रवीण ठाकूर, सचिन ठाकूर, पवनसिंह बैस, रविंद्र ठाकूर, अजयसिंह ठाकूर, दिलीपसिंह रघुवंशी, डॉ. राजेश चंद्रवंशी, अश्विन बैस, अमित पवार, धीरज ठाकूर, गणेश ठाकूर, राम ठाकूर, धर्मेंद्रसिंह बैस, दिनेशसिंह बिसेन, दिपकसिंह बिसेन, गिरीधर ठाकूर कॅटर्स, श्यामसिंह ठाकूर अनिकट, श्यामसिंह ठाकूर ऑटोपार्ट्स, महेंद्रसिंग सोमवंशी, सुरेश चंदेल, सोनू ठाकूर, गोपाल ठाकूर, मोनू ठाकूर, भगवानसिंह ठाकूर, प्रविनसिंह गौर, विक्की बैस, रवीसिंह ठाकूर, के. एन. सिंह वाशिम, आवेश चौहान, मंगेश बिसेन, नितीन बिसेन, प्रतापसिंग चौहान, अंकुर ठाकूर, जयपालसिंह ठाकूर, सुंदरसिंह ठाकूर, सुमेरसिंह ठाकूर, अश्विनसिंह ठाकूर, मनोज ठाकूर, किशोरसिंह चुंगडे, माजी नगरसेवक सुजितसिंह ठाकूर, धर्मसिंह ठाकूर , करणसिंह ठाकूर, तर पातूर येथुन राजुभाऊ उगले , अंकित बैस, निशांत बैस, रणजित बैस, शिवकुमार बैस, ज्ञानदेव गाडगे, रवी श्रीनाथ, गणेश इंगळे सोबतच श्री. सीदाजी व्यायामशाळा , छावा संघनटनेचे रणजित काळे, दिगंबर घोगरे, घुसरहून संजयसिंह ठाकूर, राजेंद्रसिंह ठाकूर उगवा, चंदूसिंह ठाकूर , ओमप्रकाश ठाकूर खांबोरा, आदित्य ठाकूर म्हैसपूर यांसह महाराणा प्रताप सेवा समितीचे पदाधिकारी , कार्यकर्ते व समाजबांधव मोठ्या प्रमाणात उपस्थित होते. अशी माहिती प्रसिद्धी प्रमुख समीर ठाकूर यांनी दिली.

शहीद संजयसिंह राजपूत यांच्या मातोश्रीच्या हस्ते प्रतिमापूजन

सकाळी 8 वाजता बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर निवासी शहिद संजयसिंह राजपूत यांच्या मातोश्री जिजाबाई भिकमसिंह दीक्षित राजपूत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी महाराणा प्रताप बाग येथे मोठ्या प्रमाणात समाजबांधव उपस्थित होते तर सकाळच्या अल्पोपहाराची व्यवस्था ठाकूर अमरसिंह चॅरिटेबल ट्रस्ट यांच्या वतीने करण्यात आली होती.