Akola-Municipal-Corporation-Employees
अकोला

महापालिकेचा सील लावण्याचा सिलसिला!: थकीत मालमत्ता करापोटी ५ मालमत्तांवर कारवाइ

अकोला: मालमत्ता कर वसुली अधिक व्हावी, यासाठी थकीत मालमत्ता धारकांवर सीलची कारवाई सुरु आहे. उत्तर आणि पश्चिम झोन मधील पाच मालमत्तांना सिल लावण्यात आले.

महापालिकेला आर्थिक वर्ष संपुष्टात येण्या आधी १४३ कोटी रुपयाचा कर वसुल करावा लागणार आहे. त्यामुळे करवसुलीसाठी महापालिकेने जप्ती मोहिम सुरु केली आहे.महानगरपालिका उत्तर क्षेत्रातील जुना भाजी बाजार येथील वार्ड क्रं. सी-१ मालमत्ता क्रमांक १२४५ धारक नागोरी खत्री जाती संस्था, अकोला भोगवटादार न्यु रिटा साडी सेंटर यांचेकडे सन २०१७-१८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा दोन लाख ५२ हजार ७६८ रुपये, तसेच दर्याव हाईट्स, गांधी रोड येथील वार्ड क्रं. सी-१ मालमत्ता क्रमांक ७०६ धारक बिल्डर भोगवटादार श्रीहरी बिल्डर्स माहेश्वरी यांचेकडे सन २०१७-१८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा एक लाख २५ हजार ७२६ रुपये, दर्याव हाईट्स, गांधी रोड येथील वार्ड क्रं. सी-१, मालमत्ता क्रमांक ७२७ धारक बिल्डर भोगवटादार श्रीहरी बिल्डर्स माहेश्वरी यांचेकडे सन २०१७- १८ ते सन २०२२-२३ पर्यंतचा एकुण १ लाख २४ हजार १५७ रुपये कर थकीत होता.

पश्चिम झोन अंतर्गत शिवाजी नगर, जुने शहर येथील वार्ड क्र. बी-८ मा.क्र.२६२ धारक गंजवेस मस्जिद तर्फे गुलामनबी हाजी अ.अजीज यांचेकडे सन २०१५-१६ ते २०२२-२३ पर्यंतचा १ लाख ३५ हजार ८४० रुपये कर थकीत होता.थकीत मालमत्ता कराचा भरणा करण्याबाबत वारंवार सुचना करुनही मालमत्ता कराचा भरणा न केल्याने एकुण पाच मालमत्तांना सिल लावण्यात आले.

ही कारवाई आयुक्त कविता द्विवेदी यांच्या आदेशान्वये मालमत्ता कर अधिक्षक विजय पारतवार यांच्या मार्गदर्शनाखाली क्षेत्रीय अधिकारी विठ्ठल देवकते, सहायक कर अधीक्षक हेमंत शेळवणे, दिलावर खान, अविनाश वासनिक, नारायण साखरे, राम भारस्कर, चंदु मुळे,सहा. कर अधीक्षक गजानन घोंगे, पथक प्रमुख विकास मुंगी, सुहास भिरड, सदांशिव, कर वसुली लिपीक प्रवीण भालेराव आदींनी केली. दरम्यान ज्या नागरिकांकडे मालमत्ता कर थकीत आहे, त्या नागरिकांनी थकीत मालमत्ता कराचा भरणा करुन जप्तीची अप्रिय कारवाई टाळावी, असे आवाहन मालमत्ता कर विभागाने केले आहे.