अकोला

महानगरात कर्णबधिर बालकांचे स्नेहसंमेलन संपन्न

अकोला: कर्णबधिर बालकांच्या सेवेसाठी अनेक वर्षापासून सेवारत असणार्‍या स्थानीय जठारपेठ परिसरातील एकविरा मल्टीपर्पज फाउंडेशनच्या वतीने शिवजयंती पर्वावर बाबासाहेब ढोणे चित्रकला विद्यालयाच्या प्रांगणात सुश्रुतांच्या जगात हे कर्णबधिर बालकांचे स्नेहसंमेलन मोठ्या उत्साहात संपन्न झाले.

या स्नेहसंमेलनात कर्णाबधिर बालक व पालकांनी उस्फुर्त प्रतिसाद देत या स्नेहसंमेलनात सहभाग घेतला. ज्येष्ठ धन्वंतरी डॉ नानासाहेब चौधरी यांच्या अध्यक्षतेत संपन्न झालेल्या या सोहळ्याचे उद्घाटक म्हणून अमरावती चे डॉ विलास लोखंडे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून अमरावतीचे छोटूकाका वरणकार, जयंत पडगिलवार, संस्थेचे संस्थापक प्रल्हादराव बनसोड, संस्था अध्यक्ष हेमंत चौधरी, विश्वस्त अरुण दामले, संस्थेच्या सचिव सुचिता बनसोड आदी मान्यवर उपस्थित होते.

दीप प्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रतिमा पूजनाने या सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला. मान्यवरानी एकविराने चालवलेल्या मूकबधिर मुलांच्या सेवेची प्रशंसा करीत ही सेवा समाजाच्या अधिक वर्गापर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थेला जागेची अत्यंत गरज असून यात सहकार्य करण्याचे आवाहन केले.कर्णबधिरांच्या बालपणातील पुनर्वसनामुळे त्यांच्या शैक्षणिक व आर्थिक स्वालंबनाचा मार्ग प्रशस्त होणार असल्याचा सूर यावेळी व्यक्त करण्यात येऊन सुश्रुतांच्या जगात हा अभिनव प्रकल्प असल्याची प्रशंसाही यावेळी व्यक्त करण्यात आली.

यावेळी पुणे येथील उलूक महोत्सवात संस्थेचे विश्वस्त दीपक जोशी यांच्या मार्गदर्शनात सहभागी झालेल्या विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे प्रदान करून सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यानंतर रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रम संपन्न झाला.या सांस्कृतिक सोहळ्याचा प्रारंभ देवांशी मार्के व खुशी लाऊडकर या बालिकांच्या गणेशवंद नृत्याने करण्यात आला.

यानंतर बालकांनी देवा श्री गणेशा, मल्हारी मार्तंड या गीतावर सामूहिक नृत्य सादर करीत जल्लोष निर्माण केला. यावेळी संदेश कर्णबधीरांचा,झाडे जगवा आदी नाटिका ही सादर करण्यात आल्यात. कार्यक्रमात कर्णबधीर तेतून बरे झालेल्या विद्यार्थ्यांचे पालक निरंजन जवंजाळ,सचिन श्रीवास, सुनील कवळकर आदिना सन्मानित करण्यात आले.

यावेळी शाळेतील माजी पालक पिंकी जगवानी यांनी आपले मनोगत व्यक्त केले. प्रास्ताविक संस्थेच्या सचिव सुचिता बनसोडे यांनी करून उपक्रमाची माहिती दिली. कार्यक्रमाच्या यशस्वी जाती शाळेतील शिक्षिका विद्यार्थी व संस्थेतील पदाधिकार्‍यांनी मेहनत घेतला