kishan-panpalia
अर्थ ताज्या बातम्या

महानगरातील किशन पनपालिया झळकला जगविख्यात फोर्ब्स मासिकात

अकोला : जगातील वेगवेगळ्या विषयातील सर्वोच्च व्यक्तींची सूची जगविख्यात फोर्ब्सच्या यादीत झळकने हे स्वर्ग दोन बोटे उरणे सारखे आहे. अशा यादीत अकोला सारख्या मध्यम शहरातील युवा उद्योजक किशन मनोज पनपालिया याने सर्वप्रथम झळकण्याचा मान संपादन केला आहे.

एक उत्कृष्ट युवा उद्योजक म्हणून किशन हा फोर्ब्स इंडियाच्या मासिकात झळकला आहे. यामुळे अकोल्याचे नाव आता फोर्ब्स सारख्या जगविख्यात मासिकाच्या माध्यमातून जगातील सर्वोच्च व्यक्तींच्या सूचित पोहोचले आहे. किशन मनोज पनपालिया हा महानगरातील 22 वर्षीय युवक बिजनेस पेपर कन्टेन्ट या उद्योगात मुंबईत प्रवर्तक असून या माध्यमातून त्याचे नाव फोर्ब्स मासिकात झळकले आहे.

किशन हा लहानपणापासूनच कुशाग्र बुद्धीचा होता.आपण नोकरी न करता रोजगार देणारे उद्योजक व्हावें ही त्याची मनीषा होती.कारमेल शाळेचा हा विद्यार्थी शालांत परीक्षात राज्यात टॉपर होता.त्यानंतर तो उच्च माध्यमिक परीक्षेतही अव्वल राहिला.

त्याचे उच्च शिक्षण बीट्स पिलानी येथे झाले. तेथूनच बिझनेस पेपर कन्टेन्ट सारख्या कंपनिला 600 कोटी रुपयांपर्यंत पोचविण्यात त्याचा सिंहाचा वाटा आहे. आपल्या माध्यमातून त्याने 2 हजार व्यक्तींच्या मुलाखती घेतल्यात.

त्याच्या कंपनीत आज 250 कर्मचारी काम करत आहे. स्टार्टअपच्या माध्यमातून त्याने इंग्लंड देशाचा अभ्यास दौरा करून उद्योग कसा वाढवावा हे प्रशिक्षण प्राप्त केले. नुकताच तो स्टार्टअप च्या अभ्यास दौऱ्या साठी सिंगापूर येथे गेलेला आहे.डॉ चंद्रकांत पनपालिया यांचा नातू असणाऱ्या किशनच्या विश्वविख्यात उपलब्धी बद्दल त्याचे सर्व क्षेत्रात कौतुक होत आहे.