Mahatma-Phule-Backward-Class-Development-Corporation
अकोला

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाच्या योजनांसाठी अर्ज करण्याचे आवाहन

अकोला: अनुसूचित जाती व नवबौद्धांसाठी महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ राबवीत असलेल्या ५० टक्के अनुदान योजना, बीज भांडवल योजना तसेच केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक योजनेसाठी कर्ज प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय मुंबई शहर कार्यालयाकरिता सन २०२२-२३ या आर्थिक वर्षासाठी ५० टक्के अनुदान योजना उद्दिष्ट ४५ व बीज भांडवल योजनाकरिता उद्दिष्ट ४५ देण्यात आलेले आहे.

या दोन्ही योजना राष्ट्रीयकृत बँकेमार्फत राबविण्यात येतात. तसेच केंद्र शासनाच्या एनएसएफडीसी उच्च शैक्षणिक योजनेसाठी कर्ज प्रस्ताव सादर करण्याकरिता या महामंडळाच्या योजना अनुसूचित जाती व नवबौद्ध लोकांच्या स्वयंरोजगारासाठी लाभ घेऊ इच्छिणार्‍या अर्जदारांनी यापूर्वी महामंडळाच्या कुठल्याही योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तसेच अर्जदारांनी महामंडळाच्या नियमाप्रमाणे आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करून तीन प्रतीतील अर्ज स्वतः अर्जदाराने मुळ कागदपत्रासह उपस्थित राहून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळ मर्या., जिल्हा कार्यालय मुंबई शहर कार्यालयात दाखल करावे.

त्रयस्थ तसेच मध्यस्थीमार्फत कर्ज अर्ज स्वीकारण्यात येणार नाहीत. ५० टक्के अनुदान योजनेसाठी प्रकल्प मर्यादा ५० हजार रुपयांपर्यंत आणि प्रकल्प मर्यादेच्या ५० टक्के किंवा जास्तीत जास्त १० हजार रुपयांपर्यंत अनुदान देण्यात येते व उर्वरित रक्कम बँकेमार्फत देण्यात येते.

बँक कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याज आकारण्यात येते. कर्जाची परतफेड सर्वसाधारणपणे ३ वर्षात करावयाची आहे. बीज भांडवल योजनेसाठी प्रकल्प मर्यादा रु. ५० हजार ते रु. ५ लाखापर्यंत., प्रकल्प मर्यादेच्या २० टक्के बीज भांडवल कर्ज महामंडळामार्फत ४ टक्के द. सा. द. शे. व्याजदराने देण्यात येते. या राशीमध्ये महामंडळाच्या अनुदानाचे १० हजार रुपये समाविष्ठ आहे. बँकेचे कर्ज ७५ टक्के देण्यात येते व या कर्जावर बँकेच्या नियमाप्रमाणे व्याजदर आकारण्यात येता