क्राईम

महंत नरेंद्र गिरी यांचा संशयास्पद मृत्यू!

नवी दिल्ली२१सप्टेंबर:-सुसाईड नोट मध्ये शिष्य आनंद गिरीच्या नावाचा उल्लेख!  आखाडा परिषदेचे अध्यक्ष महंत नरेंद्र गिरी महाराज  यांचा मृतदेह त्यांच्या अल्लारपूर येथील बाघबरी ठिकाणच्या निवासस्थानी लटकलेल्या अवस्थेत आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. मृत देहाजवळ एक सुसाईड नोट आढळून आली असून,सुसाईड नोट मध्ये,महंत नरेंद्र गिरी महाराज यांनी आपल्याला शिष्य आनंद गिरी त्रास देत असल्याने, आत्महत्या करीत असल्याचे नमूद केले आहे,त्यावरून पोलिसांनी शिष्य आनंद गिरीला अटक करण्यात आली असून, आनंद गिरी याने अटक करण्यापूर्वी प्रसार माध्यमांसमोर महंत नरेंद्र गिरी महाराज यांची आत्महत्या नसून, त्यांची हत्त्या करण्यात आली असल्याचा दावा केला आहे. पोलिसांनी त्या दिशेने तपास करावा अशी मागणी अटक करण्यात आलेल्या आनंद गिरीने केली आहे.पोलिसांनी योग्य दिशेने तपास केळ्यास सत्य परिस्थिती समोर येणार असल्याचे स्पष्ट केले आहे. आखाडा परिषदेतील सुरू असलेल्या संपत्तीच्या वादामुळे याला वेगळे वळण आले आहे. अटकेत असलेल्या आंनद गिरीने पोलिसांना दिलेल्या जबाबात, आपण या प्रकरणात दोषी आढळलो तर कायद्याप्रमाणे शिक्षा भोगायची तयारी दर्शविली आहे.मृत देहाजवळ आढळलेल्या सुसाईड नोट मध्ये या पुढे मठाचा उत्तराधिकारी कोण असेल, आणि मठाचा कारभार कसा चालवावा हे नमूद केले आहे,एकंदरीत ही सुसाईड नोट कम एकप्रकारे मृत्यु पत्र असल्याचे स्पष्ट होत आहे. यापूर्वी महंत नरेंद्र गिरी महाराज आणि शिष्य आनंद गिरी यांच्यात वाद झाला होता, त्याची चर्चाही बऱ्याच प्रमाणात झाली होती, परंतु शिष्य आनंद गिरीने महंत नरेंद्र गिरी महाराज यांची माफी मागून वादावर पडदा पडला होता. शेवटी शवविच्छेदनाचा अहवाल आल्यावरच महंताची हत्त्या की आत्महत्या याचा उलगडा होणार आहे.