अकोला

मनपाच्या खुल्या जगातील कार्यक्रमातुन आयोजकांची चांदी, मनपाला चुना

अकोला :अकोला मनपा म्हणजे ‘आंधळे दळते आणि कुत्र पीठ खाते ‘ अशी मनपा ची अवस्था आहे. अशाच अनेक प्रकारांपैकी एक प्रकार म्हणजे मनपा अधिनस्त खुल्या जागा आणि त्यांचा वापर. खुल्या जागा कोणाला आणि कोणत्या उद्देशाने वापरावयास दिल्या त्याची उद्दिष्टपूर्ती झाली की नाही, त्या जागांचा वापर प्रत्यक्षात कोण करतो, कोणी किती पक्के बांधकाम केले त्याचा वापर नेमका कशासाठी होतो याचा मागोवा घेण्याचीही गरज मनपा प्रशासनाला कधीच वाटली नाही.

शहरांत अशा अनेक ठिकाणी मनपाच्या खुल्या जागांचा वापर काही ठिकाणी वैयक्तिक, सामाजिक, तर कधी धार्मिक कारणांसाठी बिनबोभाटपणे नागरिक करताना दिसतात. व अनेक कर्यक्रमांसाठी नागरिकांन कडुन वर्गणीही जमा करण्यात येते. ना मनपाची परवानगी, ना पोस्टर ना फलकांची परवानगी, ना लाऊडस्पिकर ची परवानगी, संध्याकाळी कार्यक्रम असल्यास अतिरिक्त दिव्यांच्या वापरासाठी विदयुत पुरवठाही विदयुत खांबांवरून तार टाकुन.अशा अनेक कार्यक्रमाद्वारे आयोजक मात्र आपले उखळ पांढरे करुन घेतात.

विषेश म्हणजे या प्रकारची भनकही मनपा प्रशासनाला लागत नाही याचे नवलच वाटते. वास्तविक मनपा प्रशासनाच्या हद्दीत कोणत्याही प्रकारच्या कार्यक्रमाची पुर्व परवानगी घेणे बंधनकारक आहे आणि हे तर मनपाच्या जागेवरच कार्येक्रम होतात.

असे सगळे घडत असताना मनपा प्रशासन सुस्त का? प्रतिनिधीने शहराच्या दक्षिण विभागात फेरफटका मारला असता दक्षिण विभागातील खुल्या जागेवर मंदिराच्या मागच्या बाजुला पक्के बांधकाम करुन त्या जागेतुन भागीदारीत चक्क बिछायत केंद्राचा धंदाच थाटला असल्याचे दृश्य दिसलें . सदर व्यवसाय एका माजी नगरसेवकाच्या कृपेने होत असल्याचे कळते. आर्थिकदृष्ट्या डबघाईस आलेले मनपा प्रशासन सहजासहजी प्राप्त होणार्‍या आर्थिक उत्पन्नाकडे दुर्लक्ष करीत आहे की जाणीवपूर्वक आंधळेपणाचे सोंग आहे याची शहानिशा होणे गरजेचे आहे.

काही जेष्ठ नागरिकांनी दिलेल्या प्रतिक्रिये प्रमाणे मनपाचा दक्षिण विभाग राजकीय कार्यकर्त्यांना आणि पुढार्‍यांना फक्त निवडणुकीपुरता आठवतो आणि मनपा प्रशासनाला कर वसुलीसाठी, अशा तीव्र आणि तिखट प्रतिक्रिया नागरिकांनी व्यक्त केल्या, याची दखल आयुक्तांनी स्वतः फेरफटका मारून घ्यावी तसेच खुल्या जागांची वस्तुस्थिती जाणुन घेण्यासाठी एक समिती स्थापन करुन खुल्या जागांचे वास्तव बाहेर आणावे अशाही अशा व्यक्त केल्या.