गेल्या वीस वर्षांपासून, मृतकाला जिवंत दाखवून शासनाची दिशाभूल करीत असल्याची बाब,
माहिती अधिकारातुन उघड !
अकोला प्रतिनिधी:-२८ऑक्टोबर अकोला शहरातील प्रसिद्ध मद्य व्यावसायिक राजेंद्र ब्रिजकीशीर जयस्वाल याने,अमरावती जिल्ह्यात येत असलेल्या, दर्यापूर तालुक्यातील मौजे कडाशी येथील काँग्रेसचे दिवंगत नेते स्वर्गीय पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे, यांच्या नांवाने सन१९७१नंतर महाराष्ट्र शासनाने दिलेल्या देशी व विदेशी दारू विक्री अनुज्ञप्ती हडपण्याच्या प्रकार, अकोला जिल्ह्याधिकारी निमा अरोरा यांनी १७सप्टेंबर रोजी दिलेल्या, आदेशानुसार समोर आला आहे. यापेक्षाही गंभीर बाब अशी आहे की, गेल्या वीस वर्षांपूर्वी मरण पावलेल्या, स्वर्गीय पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे यांना,जिवंत दाखवून मद्य सम्राट राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल हा मे.विदर्भ वाईन शॉप या नांवाने विक्रीकर भरीत असल्याची धक्कादायकबाब माहितीच्या अधिकारात उघड झाली आहे. याबाबत थोडक्यात माहिती अशी आहे की,अमरावती जिल्ह्यात येत असलेल्या, दर्यापूर तालुक्यातील मोजे कडाशी येथील रहिवासी असलेले,स्वर्गीय पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे यांना सन १९७१ते१९७३या दरम्यान देशी व विदेशी दारू विक्रीचा परवाना राज्य शासनाच्या वतीने देण्यात आला होता. नमूद परवाना चालविण्यासाठी तांत्रिक, आर्थिक आणि कौटुंबिक त्रुटी असल्याने, स्वर्गीय पुरुषोत्तम तु.गावंडे यांनी, राजेंद्र जयस्वाल यांचे वडील ब्रिजकिशोर जयस्वाल यांच्या सोबत भागीदारी करून सुरू केला होता.असे दस्तऐवज वरून दिसत आहे.नमूद भागीदारी अंतर्गत१९८७पर्यंत ही अनुज्ञप्ती सुरू असल्याचे राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला यांच्या रेकॉर्ड नुसार समोर येत आहे.परंतु सन१९८७साली या अनुज्ञप्ती मध्ये भागीदार असलेले ब्रिजकिशोर व.जयस्वाल यांचे निधन झाले.त्यावेळी राज्य सरकारच्या नियमानुसार ही भागीदारी संपुष्टात आली, असे क्रमप्राप्त होते.परंतु ही भागीदारी बनावट स्वाक्षरीचे दस्तऐवज सादर करून पुढे दाखविण्यात आल्याचे दर्शविण्यात आले आहे.त्यानंतर नमूद मूळ अनुज्ञप्ती धारक पुरुषोत्तम गावंडे यांचे १२फेब्रुवारी२०००रोजी निधन झाले.नियमानुसार १२फेब्रुवारीला मूळ अनुज्ञप्ती धारकाचे निधन झाले, ही माहिती राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला,जिल्हा अकोला यांना कळविणे बंधनकारक होते. परंतु मद्य सम्राट राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल यांनी ही माहिती हेतुपुरस्सरपणे शासनापासून लपवून ठेवली, ही बाब राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याने राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या कार्यलायत सादर करण्यात आलेल्या, दस्ताऐवजावरून समोर आली आहे. मद्य सम्राट राजेंद्र जयस्वाल एवढ्यावरच न थांबता त्याने सन २०१८मध्ये अनुज्ञप्तीवरून पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे यांचे नाव कमी करून, माझे एकट्याचे नांव समाविष्ट करण्यात यावे, यासाठी राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला यांच्याकडे अर्ज दाखल केला.राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकाऱ्याला अनुज्ञप्तीवर नांव कमी करणे किंवा नांव नमूद करणे ही बाब राज्य उत्पादन शुल्क विभाग अकोला यांच्या अखत्यारीत येत नसल्याने,नमूद अर्ज अकोला जिल्हाधिकारी यांच्या कडे सादर करण्यात आला. आणि नेमक्या याच वेळी,या प्रकरणात होणाऱ्या गैर प्रकाराला वाचा फुटली, आणि अकोला जिल्ह्याचे तत्कालीन जिल्हाधिकारी आस्थिककुमार पांडे यांनी, अकोला जिल्ह्याचे राज्य उत्पादन शुल्क विभागाचे जिल्हा अधीक्षक राजेश कावळे यांना, मूळ अनुज्ञप्ती धारक यांच्या दर्यापूर तालुक्यातील कडोशी या मूळगावी पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे यांच्या वारसांच्या (नातेवाईकांच्या) नांवे नोटीस बजाण्याचे आदेश देण्यात आले.जिल्हाधिकारी पांडे यांच्या आदेशानुसार नोटीस काढण्यात आल्यावर, आपल्या वडिलांच्या नांवाने, देशी व विदेशी दारू विक्रीचा परवाना असल्याची माहिती, पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे यांचे पुत्र अमित पुरुषोत्तम गावंडे यांना मिळाली.त्यानंतर अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी माहितीच्या अधिकाराच्या अंतर्गत माहिती गोळा करून, न्याय मिळविण्यासाठी प्रयत्न सुरू केले. आणि त्यानंतर एकामागून एक धक्कादायक बाबी समोर येऊ लागल्या.राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याने नमूद अनुज्ञप्ती हडपण्यासाठी पुरुषोत्तम तुळशीरामजी गावंडे यांच्या मृत्यूनंतर, पुरुषोत्तम गावंडे यांचे दुसरे लग्न झाले असल्याचे भासवून, मृतक गावंडे यांचे चरित्र हनन करण्याचा प्रयत्न देखील राजेंद्र जयस्वाल याने बनावट दस्तऐवज सादर करून या प्रकरणात केला आहे.परंतु हा सर्व प्रकार खोटा असल्याचे चौकशी अंती सिद्ध झाले. एकंदरीत या सर्व प्रकाराला राज्य उत्पादन शुल्क विभागाचे तत्कालीन अधीक्षक राजेश कावळे सह आणखी कोणकोणत्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी शासनाची दिशाभूल करून राजेंद्र जयस्वाल याला सहकार्य केले,शोध घेण्याची गरज या निमित्ताने झाली आहे.मूळ अनुज्ञप्ती धारकाचे वारस अमित पुरुषोत्तम गावंडे यांनी, ह्या प्रकरणी, अकोला जिल्हाधिकारी यांच्या कडे याचिका दाखल केली होती. या याचिकेची सुनावणी, तत्कालीन जिल्हाधिकारी अस्थिक पांडे,जितेंद्र पापळकर आणि निमा अरोरा यांच्याकडे पार पडली, आणि या प्रकरणी१७ सप्टेंबर २०२१रोजी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी, याचिकेकर्ते अमित पुरुषोत्तम गावंडे यांच्या बाजूने निर्णय देऊन, जिल्हाधिकरी निमा अरोरा यांनी त्यांच्या आदेशात .राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल याला आरोपीच्या पिंजऱ्यात उभेे केले आहे.तरीही .राजेंद्र ब्रिजकिशोर जयस्वाल विरोधात शासनाची दिशाभूल करून,मूळ अनुज्ञप्ती धारक यांना, त्यांच्या हक्कापासून वंचित ठेऊन,अनुज्ञप्ती हडपण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी , पोलिसांत तक्रार दाखल केली जात नाही, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे.