ताज्या बातम्या महाराष्ट्र राजकीय

भिडे वाड्यातील भाडेकरूना १० मार्चच्या आत रेडीरेकनरनुसार मोबदला मिळणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

मुंबई,दि.२८ फेब्रुवारी :- भिडे वाड्याच्या प्रश्नावर न्यायालयात सुनावणी सुरु आहे. हा प्रश्न तातडीने मार्गी लागण्यासाठी १० मार्चच्या आत भाडेकरूना रेडीरेकनर तसेच बाजारमुल्याप्रमाणे मोबदला देण्यात येऊन हा प्रश्न सोडवावा असे आदेश राज्याचे मुख्य सचिव यांच्या मार्फत पुणे महानगरपालिका आयुक्तांना देण्यात आले आहे, अशी माहिती राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विधानसभेत दिली 

राष्ट्रवादीचे आमदार छगन भुजबळ यांनी आज भिडे वाड्यातील मुलींच्या शाळेबाबत सभागृहात तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. यावर उत्तर देताना ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले की, भिडे वाडा या मिळकतीच्या भुसंपादनाची कार्यवाही पुणे महापालिकेकडून सुरू असून, न्यायालयीन दाव्यामुळे सदरचे भूसंपादन प्रलंबित आहे. मात्र मालक विकासक व भाडेकरू यांच्यात बैठका घेऊन त्यावर तोडगा काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत. या कामासाठी निधी कमी पडू देणार नाही असे आश्वासन देखील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलें.त्याचा अहवाल कोर्टास सादर करून हा प्रश्न सोडविण्यात येणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सभागृहात दिली.या प्रश्नांबाबत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे आमदार चेतन तुपे यांनी देखील आग्रही भूमिका मांडली…

——-