अकोला

भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटीची अर्थसंकल्पात तरतूद

दिलेला शब्द पाडला मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचे आभार- संदिप भुस्कट

अकोट: भिडे वाडा या राष्ट्रीय स्मारकासाठी यंदाच्या अर्थसंकल्पामध्ये ५० कोटीची तरतूद करण्याची मागणी माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी केली होती. ती अर्थमंत्री तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये ५० कोटीची तरतूद केल्यामुळे त्यांचे माळी महासंघ महाराष्ट्र तर्फे अभिनंदन करण्यात येत आहे.

या संदर्भात २०१९ मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत प्रधान सचिव भूषण गगराणी व पुणे मनपा आयुक्त राव यांच्या उपस्थितीत बैठक घेण्यात आली होती. त्यानुसार या जागेचे असलेले मालक व व्यावसायिक यांना न्यायालयात मोबदला मिळावा, याकरिता दावा दाखल केला होता त्या चर्चेनुसार सरकार मोबदला देत असतील तर दावा मागे घेण्यास तयार आहेत असे त्यावेळी ठरले होते.

दरम्यान, भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी सन २०१५ पासून माळी महासंघ सातत्याने पाठपुरावा करत असून यंदाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात भिडे वाडा राष्ट्रीय स्मारकासाठी ५० कोटीची तरतूद करण्याची मागणी माळी महासंघाचे विभागीय अध्यक्ष राजेश जावरकर, जिल्हाध्यक्ष सतीश चोपड, जिल्हा महिला अध्यक्ष संध्या देशकर, विभागीय उपाध्यक्षा दुर्गा भड, शहर उपाध्यक्ष प्रभाकर बोळे, ग्रामीण जिल्हाध्यक्ष दीपक खोलोकार, सहकार प्रदेश अध्यक्ष संदीप भुस्कट, विभागीय उपाध्यक्ष झाडे, विधी जिल्हाध्यक्ष ड. प्रवीण करूले, वासुद, लोखंडे, मसने, गांजरे, रंजना मेहरे, निलाक्षी गांजरे, मधुरा धनोकार, वर्षा बोबडे, मोहन बेलसरे, नंदकिशोर बोबडे, उमाकांत चिंचोळकर, दीपक मेहरे, माळी महासंघ अधिकारी आघाडीचे वरोकार, विक्रांत इंगळे यांनी केली होती.

त्याचे अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पामध्ये ५० कोटींची तरतूद केल्यामुळे त्यांचे माळी महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश ठाकरे यांनी कौतुक केले. तसेच महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष माळी महासंघ सहकार आघाडीचे संदीप भुस्कट यांनी सुद्धा त्यांचे तोंड भरून कौतुक केले आणि देवेंद्र फडणवीस यांना दिलेला शब्द त्यांनी पाडला त्यामुळे त्यांचे संपूर्ण महाराष्ट्राच्या माळी संघाच्या वतीने त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.