मुर्तिजापूर : येथील नगर परिषदेचे माजी नगरसेवक तथा भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष सचिन देशमुख यांची जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
माजी केंद्रीय मंत्री तथा अकोल्याचे खासदार संजय धोत्रे, संघटन मंत्री उपेंद्र कोठीकर, भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष तथा आमदार रणधीर सावरकर, आमदार हरीश पिंपळे तथा तालुकाध्यक्ष भूषण कोकाटे आदी पदाधिकार्यांच्या उपस्थितीत सचिन देशमुख यांची भारतीय जनता पार्टीच्या अकोला जिल्हा सचिव पदी निवड करण्यात आली.
सचिन देशमुख यांनी यापूर्वी नगर परिषदेत उपाध्यक्ष पद, भारतीय जनता युवा मोर्चाच्या जिल्हाध्यक्षपदी कार्य केले असून त्यांच्या कार्याची दखल घेऊन पार्टी पक्षाने त्यांची पदोन्नती केली असल्याची माहिती पदाधिकार्यांकडून मिळाली.