अमरावती

भाजपाविरोधात अमरावती जिल्हा काँग्रेसचे पोलखोल आंदोलन

अमरावती, 22 फेब्रुवारी:  केंद्रातील भाजप सरकार उद्योगपतींवर कसे मेहेरबान आहेत, जनतेच्या पैशाची कशी त्यांनी लूट चालवलेली आहे, याची पोलखोल करण्याकरिता आता जिल्हा काँग्रेसने पुढाकार घेतला असून ती पोलखोल जनतेसमोर मांडण्याकरिता तालुका स्तरावर येत्या आठ ते दहा मार्च दरम्यान एलआयसी व एसबीआय बँक समोर निदर्शने केली जाणार असल्याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बबलू देशमुख यांनी दिली

अमेरिकेतील हिंडेनबर्ग संस्थेच्या अहवालाने अदानी उद्योग समुहातील महाघोटाळा उघड झाला असून पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजप सरकार अदानी उद्योगपतीवर मेहरबान असल्याचे उघड झाले आहे. मोदी सरकारचे धोरणच ‘हम दो हमारे दो’, असल्याचे पुन्हा स्पष्ट झाले आहे. देश गंभीर आर्थिक परिस्थितीतून जात असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील महत्वाचे सार्वजनिक उद्योग व पायाभूत सुविधा अदानी समूहाला विकण्याचा सपाटा लावला आहे. देशातील जनतेचा SBI आणि LIC सारख्या सार्वजनिक संस्थांमधील कष्टाचा पैसा मोदी सरकारने अदानी समुहात बेकायदेशीरपणे गुंतवला. कोट्यवधी गरीब आणि मध्यमवर्गीय भारतीयांची करोडो रुपयांची बचत व गुंतवणूक धोक्यात आली आहे. काँग्रेस पक्ष हा मुद्दा संसद, प्रसारमाध्यम, सोशल मीडिया आणि लोकांसमोर सर्व स्तरांवर मांडत आहे. काँग्रेस पक्षाने देशभरातील २३ शहरांमध्ये मोदी सरकार व अदानीच्या महाघोटाळ्याची पोलखोल केली. या घोटाळ्याची मात्र भाजपकडून ईडीची चौकशी लावल्या जात नाही याउलट मात्र विरोधकांवर ईडी चा वापर केल्या जात आहे, याशिवाय भाजपकडून मोठ्या प्रमाणात महापुरुषांचा देखील अपमान केल्या जात आहे याकडे मात्र हेतू पुरस्पर दुर्लक्ष करीत आहे यावरून त्यांना महापुरुषांचा अपमान मान्य आहे का असा प्रश्न देखील यावेळी जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख यांनी उपस्थित केला, याच धरतीवर अमरावती जिल्ह्यामध्ये देखील भाजप विरोधात पोलखोल आंदोलन केले जाणार आहे, तालुकास्तरावर येत्या आठ ते दहा मार्च दरम्यान जिल्हाध्यक्ष बबलू देशमुख, माजी मंत्री तथा आ, यशोमती ठाकूर ,माजी आमदार वीरेंद्र जगताप, आमदार बळवंत वानखडे यांच्या नेतृत्वात तालुकास्तरावर आंदोलन केले जाणार आहे, यावेळी केंद्र शासनाच्या विरोधात निदर्शने केली जाणार असल्याची माहिती देशमुख यांनी दिली,