क्राईम

भरदिवसा न्यायालयातच गोळीघालून गॅंगस्टरची हत्त्या! पोलीस आणि गॅंगस्टर झालेल्या कारवाईत हल्लेखोरांचा खात्मा!

दिल्ली२४सप्टेंबर:-देशाची राजधानी असलेल्या दिल्लीच्या रोहिणी कोर्टाच्या नं२च्या समोर भरदिवसा गोळीबार करण्यात आला, या गोळीबारात कुख्यात गॅंगस्टर जितेंद्र गोगी हा जागेवरच ठार झाला, तर पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान वकिलांच्या वेशात आलेल्या हल्लेखोरांचा इन्काउंटर दरम्यान मृत्यू झाला.ही घटना २४सप्टेंबरच्या दुपारी१वाजता दरम्यान घडली,या घटनेत चार ते पाच जण जखमी झाले असून यात एका महिला वकिलाचा समावेश आहे,असल्याची देखील माहिती आहे. माहितीनुसार दिल्लीतील रोहिणी कोर्टात गॅंगस्टर  जितेंद्र गोगीला सुनावणीसाठी आणण्यात आलं होतं. यावेळी वकिलाच्या वेशात आलेल्या शूटर्सनी त्याच्यावर गोळीबार केला. यात त्याचा जागेवर मृत्यू झाला. यानंतर पोलिसांनी प्रत्युत्तरात कारवाई करत शूटर्सचा एन्काऊंटर केला. ही घटना रोहिणी कोर्टाच्या रूम नंबर-207 मध्ये घडली. या शूटआऊट मध्ये चार ते पाच जण जखमी झाले असून त्यांना दवाखान्यात दाखल करण्यात आलं आहे. पोलिस सूत्रांनी दिलेल्या माहिती नुसार , एन्काऊंटर मध्ये टिल्लू गॅंगच्या दोघांचा खात्मा करण्यात आला आहे. हे दोघे वकिलांच्या वेशात  रोहिणी कोर्टात आले होते. यांनीच जितेंद्र गोगीला गोळ्या घातल्या होत्या. टिल्लू गॅंगच्या राहुल आणि मॉरिष असे हल्लेखोरांची  नावं आहेत.  पोलिसांनी सांगितलं की, गँगस्टर गोगी आणि टिल्लू गॅंगमधील पूर्व वैमनस्यातून ही घटना घडली आहे. दरम्यान कोर्टाच्या परिसरात भर दिवसा घडलेल्या या घटनेमुळं एकच खळबळ उडाली असून पोलिस प्रशासन आणि सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जाऊ लागलं आहे.  कोण होता जितेंद्र गोगी जितेंद्र गोगी हा दिल्लीतील टॉप मोस्ट गॅंगस्टर होता. दिल्ली पोलिसांनी त्याच्यावर ४ लाखांचे  बक्षीस ठेवन्यात आले होते. तर हरिणाया पोलिसांनी देखील गोगीवर अडीच लाखांचे बक्षीस ठेवण्यात आले होते,दिल्ली पोलिसांनी गुडगाव परिसरातुन जितेंद्र गोगीला अटक केली होती. दिल्लीच्या नरेला परिसरात एक स्थानिक नेता  वीरेंद्र मान यांच्या हत्याकांडात जितेंद्र गोगी आणि त्याच्या गॅंगचा सहभाग होता.  जितेंद्र उर्फ गोगी वर हरियाणाची प्रसिद्ध सिंगर हर्षिता दाहियाच्या हत्येचा देखील आरोप होता. दिल्ली आणि हरियाणा राज्याची पोलिस गँगस्टर गोगीचा शोध घेत होते