Bharatpur-dhamm
अकोला

भरतपूरच्या दोन दिवशीय बौध्द धम्म परिषदेस प्रारंभ!

आळस हा माणसाचा शत्रू- भदंत विणयपाल थेरो

माझोड: तथागत सदधम्म बहुउद्देशीय प्रशिक्षण मंडळ भरतपूरच्या वतीने शनिवार दि.२५ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजता भरतपूरच्या बौध्द धम्म परिषदेस बुध्द भक्तीने ओथंबलेल्या वातावरणात प्रारंभ झाला.

प्रारंभी उपस्थित भिक्षुणी तथागत गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पुष्पदीप धुपाने पूजन केले. त्यानंतर उपस्थित हजारो महिला-पुरुषांना त्रिशरण-पंचशील देण्यात आले. त्यानंतरच्या धम्मदेशनेत बोलतांना भदंत विणयपाल यांनी आळस हा माणसाचा मोठा शत्रू असल्याचे सांगितले. त्यामुळे आळस सोडून आपआपली कामे पूर्ण करा असे आवाहन त्यांनी केले.

या वेळी विचारपीठावर भदंत विणयपाल थेरो,भदंत श्रद्धानंद थेरो, भदंत उपाली थेरो,भंतें संजीव, भन्ते राजरत्न, भन्ते परिसेन, भन्ते चंद्रमनी, श्रामनेर परिसेन, आर्या बोधी प्रिया आदी उपस्थित होते. उपस्थित सर्व भन्ते यांनी हजारो नागरिकांना धम्मसंदेश दिला. रविवार दि.२६ फेब्रुवारी रोजी धम्म परिषदेचा समारोप करण्यात येईल.

Bharatpur-dhamm

समारोपीय धम्मदेशनेसाठी मुळावा येथील धम्मसेवकजी महाथेरो उपस्थित राहणार आहेत. धम्म परिषद यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष भास्करराव खंडारे, सचिव जयसेन खंडारे, उपाध्यक्ष शत्रुघ्न खंडारे, तसेच नाजूकरव खंडारे, संजय खंडारे, सुमेध खंडारे, देवेंद्र इंगळे,आदींसमवेत इतर ग्रामस्थ प्रयत्न करीत आहेत.