exam-cheating
ताज्या बातम्या

भंडार्‍यात बारावीच्या विद्यार्थीनींची परीक्षा केंद्रावर लाजिरवाणी तपासणा

भंडारा : बारावी बोर्डाच्या परीक्षा सुरू आहेत. पेपर फुटीच्या बातम्या येत आहेत. पेपरमध्येच उत्तरं छापल्याच्या बातम्या येत आहेत. पण भंडार्‍यात परीक्षा केंद्रावर चेकिंगच्या नावाखाली विद्यार्थिनींची तीन ते चारवेळा लाजिरवाणी आणि किळसवाणी शारीरिक तपासणी होत असल्याचा प्रकार समोर आला आहे.

भंडार्‍यातील शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा प्रकार घडला आहे. परीक्षेआधी अशा प्रकारच्या तपासणीमुळे विद्यार्थीनींचं मानसिक खच्चीकरण होत असल्याचं सांगत शाळेनं जिल्हाधिकार्‍यांकडे तक्रार दाखल केली आहे. दरम्यान या प्रकारामुळे जिल्ह्यात संतापाचं वातावरण आहे. भंडार्‍यातील शहापूर येथील नानाजी जोशी विद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर हा किळसवाणा प्रकार घडल्याची तक्रार विद्यार्थ्यांनी दिली आहे.

शहापूर येथील नानाजी जोशी महाविद्यालयाच्या परीक्षा केंद्रावर डिफेन्स सर्व्हिसेस कनिष्ठ महाविद्यालयाचे ३०६ विद्यार्थी आणि नानाजी जोशी विद्यालयाचे १४६ विद्यार्थी बारावीची परीक्षा देत आहेत.डिफेन्स सर्व्हिसेस कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांसोबत हा प्रकार घडला आहे.

कॉपीमुक्तच्या नावावर परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्यांची तीन ते चार वेळा शारीरिक तपासणी करण्याचा किळसवाणा प्रकार होत असल्यानं विद्यार्थी मानसिकदृष्ट्या कमजोर होत आहे. शहापूर येथील परीक्षा केंद्रावर झालेल्या प्रकाराची जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार झाल्यानं जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.

अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील परीक्षा केंद्रावर पैसे देऊनही इंग्रजी विषयाची कॉपी न दिल्याने एजंटला मारहाण झाल्याची चर्चा आहे. ही मारहाण मुंबई-पुण्यासह राज्यातील इतर भागातील विद्यार्थ्यांकडून करण्यात आली आहे. २१ फेब्रुवारी) बारावीचा पहिला इंग्रजीचा पेपर होता. या पहिल्या पेपरलाच पाथर्डी तालुक्यातील एका परीक्षा केंद्रावर कॉपी न पुरवल्यानं मुंबई-पुण्यासह राज्यभरातील विद्यार्थ्यांकडून माणिकदौंडी रस्त्यावर एजंटला मारहाण झाल्याची चर्चा आहे.

याबाबत पोलिसात तक्रार झाली नसून, पुढील पेपरला आपल्याच पाल्यांना अडचण होईल म्हणून पालकांनी तक्रार दिली नसल्याचे समोर आले आहे. विद्यार्थी पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करायला गेल्याची माहिती देखील मिळत आहे.

याबाबतचा एक व्हिडीओ देखील समोर आला आहे. त्यातील संभाषणावरुन हे स्पष्ट होते की, पालक संबंधित संस्था चालकांशी फोनवरुन कॉपीबाबत बोलत आहेत. मात्र, याची पुष्टी पोलिसांनी करणं गरजेचं आहे.