अकोला

बोरगाव मंजू रेल्वे स्टेशन समस्या संदर्भात महाव्यवस्थापकांना निवेदन सादर

बोरगाव मंजू : येथील रेल्वे स्थानकावर वार्षिक निरीक्षणासाठी आलेले मध्य रेल्वेचे महाप्रबंधक नरेश लालवानी यांना बोरगाव मंजू सह परिसरातील सरपंच तथा ग्रामस्थांनी उड्डाणपूल; एक्सप्रेस थांब्यासह विविध मागण्यांचे निवेदन सादर केले.

यावेळी प्रोटोकॉलचा वाव आणत रेल्वे पोलिसांनी जमलेल्या आजूबाजूच्या गावातील सरपंच सदस्यांना दमदाटी केल्याने नाराजी नागरीकांनी नाराजी व्यक्त केली बोरगाव मंजू हे तालुकास्तरीय गाव असून त्याच्या आजूबाजूला ३० ते ४० गावे जोडलेली आहेत पोरगा मंजूर रेल्वे स्थानकावर थांबणारी पूर्वीची नागपूर भुसावल पॅसेंजर सुद्धा बंद करण्यात आली असून तिचा थांबा पूर्व सुरू करावा तसेच अमरावती सुरत सुरत अमरावती शालिमार एक्सप्रेस आधी गाड्यांना थांबा द्यावा व राज्य महामार्ग क्रमांक २४६ बोरगाव ते पडसो रस्त्यावरील लेवल क्रॉसिंग नंबर ४४ चे गेटवर उड्डाणपूल करण्याबाबत बोरगाव मंजू अन्वी मिर्जापुर वनीरंबापुर रामगाव कोलखेड मजलापुर दापुरा बैलबाडा सुकळी देवळी सह अन्य गावातील ग्रामपंचायतींनी निवेदने सादर केली.

यावेळी परिसरातील सरपंच सदस्य तथा सामाजिक कार्यकर्ते उपस्थित होते. मात्र अगदी व्हीआयपी पणाचा आव्हानात रेल्वे पोलिसांनी नागरिकांना दमदाटी केली त्यामुळे समस्या मांडणार्‍या नागरिकांनी नाराजी व्यक्त केली याबाबत शेतकरी नेते मनोज तायडे मनोज भाऊ तिवारी अन्वी चे सरपंच प्रदीप नवलकार मिर्झापूरच्या सरपंच सौ संध्या ताई फासे माजी ऊपसरपंच ब्रिजकिशोर जयस्वाल हिरासेठ जयस्वाल यांच्यासह अन्य पदाधिकायांनी सविस्तर चचाँ केली असता चौकशी करून निणँय घेण्याचे आश्वासन महाप्रबंधक नरेश लालवाणी यांनी दिले.