क्राईम

बोरगावात बियरबार फोडून चोरी,चार लाखांची विदेशी दारू लंपास!

सुनील जैन
बोरगाव (मंजू):-२५ऑगस्ट,
पोलिस ठाण्याच्या हद्दीतील राष्ट्रीय महामार्गावरील बोरगाव मंजू येथील एका बियरबारचे  लोखंडी शटर तोडुन अज्ञात चोरट्यांनी विदेशी दारू साठ्यावर डल्ला मारुन चार लाख सहाशे रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना बुधवारी सकाळी उघडकीस आली, बोरगाव मंजू पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध गुन्हा  दाखल केला,
प्राप्त माहितीनुसार बोरगाव (मंजू) नजीक राष्ट्रीय महामार्गावर चैतन्य बियर बार आहे.मंगळवारी रात्री नेहमी प्रमाणे दुकान बंद केले होते, दरम्यान मंगळवारी रात्री दरम्यान अज्ञात चोरट्यांनी सदर वाईन बारचे  मुख्य शटरचे कुलुप तोडुन व शटर चे असे दोन्ही मुख्य व्दारे तोडुन अज्ञात चोरट्यांनी आत प्रवेश केला, दरम्यान सदर चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरा यांचे तोडफोड करून कॅम्पुटरसह सी.सी.टिव्ही. कॅमेऱ्याची हार्डडिस्क सह दुकानातील विदेशी दारू साठा,असा एकुण  चार लाख रुपये किंमतीचा मुद्देमाल चोरट्यांनी लंपास केला, दरम्यान बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे चैतन्य बारचे मालक संजय निलखन, पुरुषोत्तम निलखन हे दुकान उघडण्यासाठी बुधवारी सकाळी नेहमीप्रमाणे आले असता सदर दुकानाचे शटर तोडलेल्या अवस्थेत असल्याचे आढळून आले, तसेच चोरट्यांनी दुकानातून काही विदेशी दारू बॉक्स आवारात टाकून दिले, दरम्यान सदर घटनेची माहिती संजय निलखन यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात दिली. त्यावरून घटना स्थळी ठाणेदार सुनील सोळंके सह हेडकॉन्स्टेबल इंगळे, मोरे यांनी घटनास्थळी धाव घेऊन घटनेचा पंचनामा केला. दरम्यान पोलिसांनी श्वान पथक तसेच ठसे तज्ज्ञ यांना पाचारण केले परंतु अज्ञात चोरट्याचा सुगावा लागला नाही,सदर घटनेची फिर्याद चैतन्य बियर बार चे मालक संजय निलखन यांनी बोरगाव मंजू पोलिस ठाण्यात दिली वरून पोलिसांनी अज्ञात चोरट्या विरूद्ध विविध कलमाखाली गून्हे दाखल करून ,पुढील तपास ठाणेदार सुनील सोळंके सह बोरगाव(मंजू)पोलीस करत आहेत.