क्राईम

बोरगाव(मंजू)येथून अवैध शस्त्रसाठा जप्त!

अकोला स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई! 
अकोला प्रतिनिधी:-२३नोव्हेंबर रोजी अकोला जिल्ह्यातील बोरगाव(मंजू) येथून मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठ्यासह शस्त्र बनविण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य जप्त करण्यात अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाला यश आले आहे. अकोला स्थानिक गुन्हे शाखेच्या चमूने केलेल्या या कारवाईमुळे बोरगाव(मंजू)पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. अकोला  स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांनी दिलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार अकोला जिल्ह्यातील बोरगाव(मंजू)पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मौजे बोरगाव(मंजू)येथे मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा असल्याची गोपनीय माहिती, अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक संतोष महल्ले यांना मिळाली होती की, बोरगाव(मंजू) येथील रहेमत नगर येथील रहिवासी सलीम शहा शब्बीर शहा याच्या घरात मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा आणि शस्त्रनिर्मिती करण्यासाठी वापरण्यात येणारे साहित्य आहे.त्या माहितीच्या आधारे पोलीस निरीक्षक यांनी सापळा रचून, सलीमशहा शब्बीरशहा रा.बोरगाव(मंजू) याच्या घराची पंचासमक्ष झडती घेतली असता,१लोखंडी गुप्ती,३धारदार लोखंडी तलवारी,१धारदार लोखंडी फोल्डिंग चाकू, एक धारदार लोखंडी कोयता,एक लोखंडी भाल्याचे टोक,एक लोखंडी फायटर, भरमार बंदुकीच्या निर्मिती साठी वापरण्यात येणारे ३लोखंडी आणि १स्टील रॉड,भरमार बंदुकीसाठी वापरण्यात येणारे लोखंडी छर्ये, धातूचे तुकडे,गनपावडर,भरमार बंदुकीमध्ये दारुगोळा ठासून भरण्यासाठी वापरण्यात येणारा छोटा लोखंडी रॉड, आणि वन्यजीव मध्ये येणाऱ्या काळविटाचे शिंग मिळून आले.हे सर्व साहित्य पोलिसांनी ताब्यात घेऊन सलीमशहा शब्बीरशहा वय३२वर्षे आणि साबीरशहा शब्बीरशहा रा.रहेमत नगर या दोन भावंडाना अटक करण्यात आली आहे.त्यांच्या विरोधात बोरगाव(मंजू)पोलीस ठाण्यात भारतीय दंड संहिता कलम३,४,२५ आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास अकोला पोलीस करीत आहेत.ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या आदेशानुसार अकोला स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संतोष महल्ले यांच्या मार्गदर्शनाखाली  पोलीस उपनिरीक्षक गोपाल जाधव,ए.एस.आय.दशरथ बोरकर, पो. कॉ.गोकुल चव्हाण, पो.कॉ.स्वप्नील खेडकर, पो. कॉ.लीलाधर खंडारे, पो.कॉ.अन्सार,महिला पोलीस कॉन्स्टेबल जोत्स्यना लव्हाळे यांनी केली. 
बोरगाव(मंजू)पोलीस ठाण्याच्या हद्दीत एवढया मोठ्या प्रमाणात शस्त्रनिर्मिती साठी वापरण्यात येणारे साहित्य आणि शस्त्र साठा जप्त करण्यात आल्याने,या गुन्ह्यात अटक करण्यात आलेल्या आरोपींचा घातपात करणाऱ्या टोळीसोबत कनेक्शन आहे काय? किंवा वन्यजीव प्राण्यांची शिकार करणाऱ्या टोळीला यांच्या मार्फत शस्त्र पुरवठा केला जातो काय?असे अनेक प्रश्न या निमित्ताने उपस्थित केला जात आहे.अकोला पोलिसांनी याबाबत सखोल चौकशी करण्याची गरज आहे. या कारवाईच्या निमित्ताने या शस्त्र निर्मिती मध्ये आणखी किती जण सहभागी आहेत, याचीही चौकशी होणे गरजेचे आहे.