क्राईम

 बॉयफ्रेंडसोबत फिरण्यावरून  तरुणीला भररस्त्यात मारहाण!  

विक्रोळी १४ऑगस्ट:न्यूज डेस :-स्वतःच्या बॉयफ्रेंड सोबत फिरण्याच्या कारणावरून, स्वतःच्याच मैत्रीनीला भररस्त्यात मारहाणीचा व्हिडिओ शोशल मीडियावर १३ऑगस्ट पासून दिसत आहे.हा व्हिडीओ मध्ये तो माझा बॉयफ्रेंड होता. तू मध्ये का पडलीस? त्याच्यासोबत का फिरतेस, असे सवाल करीत एक तरुणी मैत्रिणीसह दुसर्‍या तरुणीवर तुटून पडली आणि विक्रोळी पूर्व येथील पूर्व द्रुतगती मार्गाच्या सर्व्हिस रोडवर झालेल्या या फ्री स्टाईल हाणामारीचा व्हिडीओ शुक्रवारी सोशल मीडियावर व्हायरल झाला.व्हिडीओमध्ये एका मुलीला दोन मुली लाथा-बुक्क्यांनी मारत आणि प्रसंगी तुडवत असताना दिसतात. तू माझ्या प्रियकरासोबत प्रेमसंबंध कशी ठेवतेस म्हणून दुसरी मुलगी तिला प्रश्न विचारत बेदम मारहाण करीत आहे,सोबत तिची मैत्रीणही तिला मारहाण करण्यास मदत करत असून, दोघी मैत्रिणी मार खाणार्‍या मुलीला अतिशय वल्गर भाषेमध्ये शिव्यांची राखोळी वाहतांना दिसत आहेत.विक्रोळी पोलीस स्टेशनच्या ठाणेदार   पोलीस निरीक्षक शुभदा चव्हाण यांनी दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही मुली टागोर नगरमधील रहिवासी आहेत आणि मैत्रिणीच आहेत. १२ ऑगस्ट गुरुवारी रोजी दुपारी सर्व्हिस रोडवर हा हाणामारीचा प्रकार घडला.तिन्ही मुलींची चौकशी सुरू आहे. तर यापूर्वीही याच मुलींचा असाच व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यामुळे या व्हिडीओमागील सत्य चौकशीनंतरच समोर येऊ शकते.मात्र या मुलींची फ्री स्टाईल हाणामारीचा हा व्हिडिओ पाहून सोशल दर्शकांनी टीका केली आहे