क्राईम

बिडी पिण्यासाठी२०रुपये दिले नसल्याच्या रागातून मजुराची गळा चिरून हत्त्या!

नासिक१२सप्टेंबर:-रस्त्यावरुन जाणाऱ्या मजुराला बिडी पिण्यासाठी२०रुपये मागितले असता, त्याने वीस रुपये दिले नसल्याच्या रागातून, धारदार कटरने गळा चिरून हत्त्या केल्याची घटना, नासिक शहरात१०सप्टेंबर रोजी घडली.हत्त्या झालेल्या इसमाचे सुनील नांव असल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.गळा चिरल्यानंतर तब्बल अर्धा किलोमीटर जखमी अवस्थेत तो मजूर जीव वाचविण्यासाठी धावत होता, मारेकरी सुद्धा त्याच्या मागे धावत होता,शेवटी काट्या हनुमान पोलीस चौकी समोरील पेट्रोल पंपाच्या जवळ जखमी तरुण जमिनीवर कोसळला, घडलेल्या प्रकाराची माहिती पोलिसांना मिळाल्यावर, जखमीला उपचारासाठी त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले, परंतु डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता,पोलिसांनी तपासाला सुरुवात करून, या खुनासंदर्भात ठोस पुरावे पोलिसांना मिळत नव्हते. त्यानंतर पोलिसांनी जखमी ज्या रस्त्याने धावत गेला होता.त्या मार्गावरील सीसीटीव्ही कॅमेऱ्याचे फुटेज तपासले असता,पोलिस चौकी पेट्रोल पंपावर एक वेळ हात धुतांना दिसला, त्यावरून पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज मध्ये हात धुणाऱ्या व्यक्तीची ओळख पटवून, तो व्यक्ती पंडित उर्फ रघुनाथ गायकवाड उर्फ लंगड्ड्या असल्याचे समोर आले. त्यावरून नमूद संशयित म्हणून रघुनाथ गायकवाड याला पोलिसांनी नासिक मधील तपोवन परिसरातून चौकशी साठी ताब्यात घेऊन, त्याची कसून चौकशी केल्यावर तो उडवाउडवीची उत्तरे देत होता,शेवटी पोलिसांनी त्याला पोलिसी खाक्या दाखविल्यावर, त्याने सुनील नामक कामगार रस्त्यावरून जात असतांना बिडी पिण्यासाठी २०रुपये मागितले असता,मृतक सुनीलने २०रुपये दिले नसल्याने, रघुनाथ। गायकवाड उर्फ लंगड्याने धारदार कटरने त्याचा गळा चिरून ,हत्त्या केल्याची कबुली पोलिसांना दिली.किरकोळ कारणावरून अश्या प्रकारे हत्त्या झाल्याने नासिक शहरातील नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे