rape
पुणे

बिअर मध्ये गुंगीचे औषध देऊन तरुणीवर बलात्कार

चंदननगर : एका २० वर्षीय तरुणीला मित्राने बिअर मध्ये गुंगीचे औषध देऊन तिला बेशुद्ध करुन तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. शारिरिक संबंधाचे व्हिडिओ काढून त्याने त्याच्या आणखी एका मित्रासोबत तरुणीला बळजबरीने शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.

याप्रकरणी दोन आरोपी तरुणांवर चंदननगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी शनिवारी दिली आहे.

शशिकांत कदम (रा.वडगावशेरी,पुणे) व मयुर दत्तात्र्य सातव (वय २१,रा. वाघोली, पुणे) असे अटक केलेल्या आरोपींचे नाव आहे. याबाबत पिडित तरुणीने चंदननगर पोलिस ठाण्यात आरोपी विरोधात तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी आरोपीवर बलात्काराचा गुन्हा दाखल करुन आरोपी मयुर सातव यास अटक केली आहे.

हा प्रकार मार्च २०२२ ते जुलै २०२२ यादरम्यान घडलेला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार पिडित तरुणी व आरोपी हे एकमेकांचे ओळखीचे आहे. आआरोपी शशिकांत कदम याने तरुणीला बिअर मध्ये गुंगीचे औषध देऊन तिच्यासोबत जबरदस्तीने शारिरिक संबंध केले. त्यानंतर त्याचे मोबाईल मध्ये त्याने याबाबतचे आक्षेपार्ह फोटो काढून तरुणीस दाखवले.

फोटो व्हायरल करण्याची धमकी देवून त्याने तिच्यासोबत वारंवार वेगवेगळया ठिकाणी जबरदस्तीने शारिरिक संबंध ठेवले.मात्र, त्यानंतरही फोटो व्हायरल करण्याची धमकी देऊन त्याने त्याचा मित्र मयुर सातव याच्याशी जबरदस्तीने तरुणीला शारिरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले.

आरोपी सातव याने तरुणला लग्न करण्याचे अमिष दाखवून तिला विविध ठिकाणी नेऊन तिच्यासोबत शारिरिक संबंध करुन प्रस्थापित केले. परंतु तरुणीने लग्नाबाबत विचारणा केली असता तिला उडवाउडवीची उत्तरे देऊन तिची फसवणुक करण्यात आली. याप्रकरणी पुढील तपास चंदननगर पोलिस करत आह