महाराष्ट्र

बाप्पांना निरोप देण्यासाठी गेलेले तीनमुले बुडाले


मुंबई, 19 सप्टेंबर :गणेश विसर्जच्या दिवशी, आपल्या लाडक्या बाप्पांना निरोप देण्यासाठी गेलेल्या तीन मुलांचा समुद्रात बुडून मृत्यू झाला, ही घटना मुंबईतील वर्सोवा  ब्रिचवर रविवारी रात्री ९वाजता घडली.या ठिकाणी एकूण ५मुलं बुडाली होती, परंतु काही उपस्थित नागरिकांच्या सतर्कतेने,पाचपैकी२जणांना वाचविण्यात यश आले. प्राप्त माहिती नुसार, गणपती विसर्जनादरम्यान वर्सोवा समुद्र किनाऱ्यावर रात्री 9 वाजेच्या सुमारास ही घटना घडली. विसर्जन करत असताना 5 जण बुडाली. सुदैवाने वेळीच स्थानिक रहिवाश्यांनी धाव घेऊन २ मुलांना वाचवले आहे. पण, 3 जण बेपत्ता झाली आहे. जीवरक्षक, आणि अग्निशमन दलाच्या साहाय्याने शोध सुरू आहे.  तसंच, नौदलाची जवानही इतर मुलांचा शोध घेत आहेत