क्राईम

 बांधकाम तोडतांना मजुराचा स्लॅब खाली दबुन मृत्यू,

वर्षा मोरे
अकोला२०ऑगस्ट:- अकोला शहरातील सिव्हिल लाईन पोलिस स्टेशन अंतर्गत येत असलेल्या रणपिसे नगर भागात असलेल्या सिग्मा कॉम्प्युटर च्या बाजूला असलेल्या “सरगम” या निवास स्थानाचे काम सुरू आहे. या ठिकाणी एका मजुरांवर अचानक स्लॅब पढल्याने तो गंभीर रित्या जखमी झाला, सदर घटनेची माहिती मिळताच निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे, उप विभागीय अधिकारी डॉ. निलेश अपार व अकोला महानगर पालिका च्या टीम ने घटना स्थळी पोहचून स्लॅब च्या भिंतीखाली दबलेल्या मजुराला बाहेर काढले.जखमी झालेला मजूर हा संपूर्ण स्लॅब खाली दबल्याने मनपा प्रशासनाच्या अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी जॅक चा वापर करीत दबलेल्या मजुराला काढले, मिळालेल्या माहिती नुसार मजूर हा स्लॅब खाली दबल्याने गंभीर रित्या जखमी झाला होता त्याला तात्काळ जिल्हा सर्वोपचार रुग्णालयात उपचारा साठी दाखल केले असता त्याचा उपचारा दरम्यान मृत्यू झाल्याचे समजते.घटनेची माहिती मिळताच मनपा प्रशासन तसेच अकोला तहसीलदार यांनी तात्काळ या भागाची पाहणी केली.