क्राईम

बहिणीची छेड काढल्याच्या रागातून तरुणाची हत्या!दोन आरोपींना अटक

नागपूर१९ऑगस्ट:-राज्याची उपराजधानी असलेल्या नागपुरात बहिणीची छेड काढल्याच्या रागातून, चाकूने भोसकून एका तरुणाची हत्त्या करण्याची घटना नागपुरात घडली.या हत्त्येप्रकारणी दोन तरुणांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेले आरोपी सख्खे भाऊ आहेत. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की, नागपूर शहरातील कपिलनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी मृतक कमलेश याने याच भागात राहणाऱ्या तरुणीची छेड काढली होती. त्याप्रकारणी त्याच्या विरोधात कपिल नगर पोलीस ठाण्यात पीडित तरुणीच्या तक्रारी वरून गुन्हा दाखल करण्यात आला होता. नमूद गुन्ह्यात मृतक कमलेश याला अटकही झाली होती.त्यानंतर न्यायालयाने त्याला जामीनवर सोडले होते.मृतक हा जामिनावर बाहेर आल्यावर, पीडित तरुणीच्या दोन सख्ख्या भावांंनी मृतक कमलेश याच्यावर पाडत ठेऊन,१८ऑगस्टच्या रात्री त्याला गाठले आणि त्याच्यावर धारदार शस्त्राने सपासप वार करून, त्याची निर्घृणपणे हत्त्या केली.याप्रकरणी कपीलनगर पोलिसांनी तरुणीच्या उज्वल आणि दीपक दोन भावंड यांना अटक करून, त्याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल केला आहे.पुढील तपास कपिलनगर पोलीस करीत