क्राईम

बलात्कारी भोंदू बाबा पोलिसांच्या ताब्यात!


पुणे १०सप्टेंबर:-श्री संत बाळूमामाचा अवतार असल्याचं सांगत,नागरिकांची फसवणूकिसह महिलांचे लैंगिक शोषण करणाऱ्या मनोहर मामा भोसले याला पुणे पोलिसांनी९सप्टेंबर रोजी अटक केली. पोलीस निरीक्षक महेश ढवान यांच्या कडून प्राप्त माहितीनुसार बाळू मामा भोसले सोलापूर जिल्ह्यातील करमाळा तालुक्यातील उंदरगाव येथील रहिवासी असलेल्या मनोहर मामा भोसले याने संत बाळू मामाचा अवतार असल्याचे सांगून, याने बारामती येथील रहिवासी शशिकांत सुभाष खरात,यांच्या वडिलांच्या कर्करोग बरा करून देण्याचा नावावर२लाख५१हजार रुपयांची फसवणूक केल्याची तक्रार शशिकांत खरात यांनी बारामती पोलीस ठाण्यात दिली होती,त्या तक्रारी वरून, मनोहर भोसले याच्यासह त्याचे सहकारी मनोहर भोसले,विशाल वाघमारे उर्फ नाथबाबा आणि ओंकार शिंदे यांच्या विरोधात बारामती पोलीस ठाण्यात फसवणूक, नरबळी, अनिष्ट अघोरी प्रथा, जादू टोना विरोधी कायद्याखाली गुन्हे दाखल करण्यात आले होते. या शिवाय मनोहर भोसले याने कारामळ्यातील एका महिलेचे लैंगिक शोषण केल्याची तक्रार केल्याने मनोहर मामा भोसले,याच्या अडचणीत वाढ झाली आहे, मनोहरमामा भोसले याच्यावर राजकीय वरहदस्त असल्याने, भविष्यात त्याच्यावर काय कारवाई करण्यात येते,याची उत्सुकता शिगेला पोहोचली होती. परंतु पुणे ग्रामीण पोलिसांनी कसल्याही दबावाखाली न येता, मनोहर मामा भोसले याला बारामती पोलिसांनी अटक केली ,असून पुढील कारवाई साठी बारामती पोलीस ताब्यात घेतील अशी माहिती मिळाली आहे.