अकोला

बजरंग दल, सेवा सप्ताह अंतर्गत मोठी उमरी स्मशानभूमीची साफसफाई

अकोला: दरवर्षी बजरंग दल संपूर्ण देशभरात ‘सेवा सप्ताह’ साजरा करत असतो, बजरंग दलाचे कार्यकर्ते संपूर्ण देशभरात ‘सेवा, सुरक्षा, संस्कार’ हे तीन तत्त्व घेऊन काम करत आहेत, त्या अंतर्गत ङबजरंग दलाचे राष्ट्रीय संयोजक निरज दानौरिया यांच्या मार्गदर्शनात बजरंग दलाचे कार्यकर्ते हिंदू युवकांना सोबत घेऊन स्मशानभूमी व मठ मंदिरांची स्वच्छता १२ मार्च ते १९ मार्च या कालावधीत आयोजित सेवा सप्ताहा  मध्ये करणार आहेत.

अनेक वर्षापासून बजरंग दल द्वारा होणार्‍या सेवा सप्ताह अंतर्गत व्यसनमुक्ती, रेन वॉटर हार्वेस्टिंग, रस्ते अपघात यावर उपाय, झाडे लावणे, रक्तदान, स्मशानभूमी व मठ मंदिर स्वच्छता, असे अनेक व विविध समाज उपयोगी कार्यक्रम राबवले जातात.

त्याच अंतर्गत आज सकाळी ७.०० वा मोठी उमरी येथील स्मशान भुमीची स्वच्छता श्रमदानातुन करण्यात आली.याप्रसंगी खालील प्रमाणे विश्व हिंदू परिषद व बजरंग दल अकोला महानगरच्या कार्यकर्त्यांनी श्रमदानात भाग घेतला त्यामध्ये विश्व हिंदू परिषद अकोला विभाग मंत्री सुरज भगेवार, अकोला जिल्हा मंत्री सुरेंद्र जयस्वाल, बजरंग दल महानगर संयोजक हरिओम पांडे, जिल्हा सहमंत्री सुधाकर बावस्कर व निलेश पाठक, जिल्हा सेवा प्रमुख मंगेश दीक्षित, जिल्हा समरसता प्रमुख संदीप निकम, तसेच अतुल आयाचीत, विजय डहाके, सागर वाघोडे, विनोद शिंदे, ज्ञानेश्वर मेहेंगे, नारायण मेहेंगे, दत्ता काळे, गजानन मदनकार, पंकज चंदेल, रुपेश कागदे, शुभम थोटांगे, अतुल राऊत, अंकुश देशमुख, दादाराव मेहेंगे, शंकर सावळे, विजय नरडे, पियुष जगताप, श्रेयश वाघमारे, राहुल पाटकर, निहाल रणपिसे, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.व पुढे सप्ताहभर अकोला महानगरात असणार्‍या विविध स्मशानभूमीची स्वच्छता बजरंग दल अकोला महानगर तर्फे करण्यात येणार आहे असे बजरंग दल महानगर संयोजक हरिओम पांडे यांनी कळवले.