विदर्भ

बगडिया महाविद्यालयात शिक्षक दिन साजरा

 

 

 

 

 

 

रिसोड५सप्टेंबर: येथील उत्तमचंद बगडिया कला व वाणिज्य महाविद्यालयात रिसोड मध्ये रविवार दि. 5 सप्टेंबर 2021 रोजी रा.से.यो. व सांस्कृतिक विभागातर्फे शिक्षक दिन संपन्न झाला डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेस प्राचार्य डॉ. विजय तुरुकमाने व इतर शिक्षक व कर्मचाऱ्यांनी अभिवादन केले. याप्रसंगी प्राचार्य डॉ. तुरुकमाने यांनी गुरूंच्या आशीर्वादामुळेच सर्व जण जीवनात यशस्वी होतात शिक्षण हाच प्रगतीचा व मुक्तीचा मार्ग आहे हे ओळखून महात्मा फुले व सावित्रीमाता फुले यांनी शाळा स्थापन करून शिक्षणाची मुहूर्तमेढ रोवली असे सांगितले. याप्रसंगी प्रा. जुनघरे प्रा. डॉ. मेश्राम प्रा. डॉ. नरवाडे प्रा. कदम प्रा. बोडखे श्री कहाकर श्री निकम श्री च-हाटे व इतर कर्मचारी तथा रासेयो विद्यार्थी-विद्यार्थिनी कोरणा नियमाचे पालन करून उपस्थित होते