क्राईम

फिरत्या पोलीस ठाण्याने केली दहातोंड्यात जनजागृती

 

अजय प्रभे

मूर्तिजापूर,ता.२८ : एक गाव एक पोलीस योजनेतील ‘पोलिस आपल्या दारी’ कार्यक्रमांतर्गत मूर्तिजापूर ग्रामीण फिरत्या पोलीस ठाण्याच्या माध्यमातून मूर्तिजापूर तालुक्यातील दहातोंडा या गावात उद्बोधन करण्यात आले.
ग्रामीणचे ठाणेदार पांडव यांच्या मार्गदर्शनाखाली स्थापन करण्यात आलेले फिरते पोलीस ठाणे आज (ता.२८) दहातोंडा गावात दाखल झाले. तेथील सरपंच, प्रतिष्ठित ग्रामस्थ व युवकांना ‘पोलीस आपल्या दारी’, या योजनेची संकल्पना समजावून सांगण्यात आली. ऑनलाइन होणारी फसवणूक उलगडवून दाखविण्यात आली. स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना येणाऱ्या अडचणी जाणून घेण्यात आल्या व त्याबाबत त्यांना मार्गदर्शन करण्यात आले. एपीआय पांडव, हेकॉ लांजेवार, गाजानन थाटे, विनोद राठोड, गजानन सयाम यांनी या उपक्रमात सहभाग दिला. यावेळी कोरोनाबाबत जनजागृती करण्यात आली व आगामी सण, उत्सवासंदर्भात सूचना देण्यात आल्या..