voilence
ताज्या बातम्या नागपूर

प्रेयसीला घरी भेटण्यासाठी गेलेल्या प्रियकराला, मुलीच्या वडिलांची लोखंडी रॉडने मारहाण!

नागपूर : प्रेयसीला घरी भेटायला गेलेल्या प्रियकराला, प्रेयसीच्या वडिलांनी लोखंडी रॉडने मारहाण केल्याची घटना नागपूर जिल्ह्यातील कळमेश्वर गावात घडली, या हल्ल्यात प्रियकर हा गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

याप्रकरणी पोलिसांनी प्रियकर मुलाच्या तक्रारिवरून प्रेयसीच्या पित्या विरोधात गुन्हा दाखल करून आरोपी वडिलांना अटक करण्यात आली आहे. हरीश असं जखमी तरुणाचे नाव असून तो कळमेश्वर येथील रहिवासी आहे.

प्राप्त माहितीनुसार, तरुणाचे त्याच्या गावात राहणाऱ्या एका तरुणीशी गेल्या आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. दोघांच्या प्रेमप्रकरणाची संपूर्ण गावात चर्चा होती. त्यामुळे ते गावच्या उद्यानात भेटत असत. अनेकांनी या दोघांना एकत्र पाहिल्याने त्यांच्या नात्याची बाब कुटुंबीयांपर्यंत पोहोचली. त्यामुळे तरुणीच्या पालकांनी मुलीची समजूत काढली.

तीला नाते तोडण्यास सांगितले. मात्र, मुलगी ऐकायला तयार नव्हती. यामुळे वडिलांनी तीला अनेकवेळा मारहाण केली.१६ फेब्रुवारी रोजी प्रेयसीच्या कुटुंबातील सर्व सदस्य शेतावर गेले होते. त्यामुळे तीने हरीशला घरी भेटण्यासाठी बोलावले. हरीश दुपारी एक वाजता मैत्रिणीच्या घरी पोहोचला. त्यांच्यात तासभर चर्चा झाली.

त्याचवेळी मैत्रिणीचे वडील घरी आले. वडिलांनी त्या दोघांना खोलीत नको त्या परिस्थितीत पाहिलं. वडील घरी परतल्याचे कळल्यावर प्रियकराने तिथून पळ काढला. संतापलेल्या वडिलांनी प्रियकराला फोन करुन त्याला बोलावले.

“मला कशासाठी बोलावले”, असे विचारले असता मुलीच्या वडिलांनी घरातून लोखंडी रॉड आणून प्रियकराला मारहाण केली. रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या प्रियकराने तातडीने पोलीस ठाणे गाठले. मैत्रिणीच्या वडिलांनी मारहाण केल्याची तक्रार त्याने केली. आता त्या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी गुन्हा दाखल केला.