मुंबई१०सप्टेंबर:-कोरोनाच्या पार्श्वभूमीवर शासनाने ठरवून दिलेल्या नियमांची पायमल्ली करीत,एका पोलीस निरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्याने पत्रकारांना धक्काबुक्की केल्याने,पोलिसांच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित केला जात आहे. संजय निकम असे वादग्रस्त पोलीस अधिकाऱ्याचे नांव आहे.ही संतापजनक घटना मुंबईतील लालबागच्या राज्याच्या मंडप असलेल्या ठिकाणी घडली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी आहे की,१०सप्टेंबर रोजी, लालबागच्या राजाचा मंडप कोणत्याना कोणत्या कारणांमुळे नेहमीच चर्चेत असतो, याठिकाणी कधी कार्यकर्त्यांमध्ये असलेले वाद, तर कधी पोलिसांचा अडेलतट्टू पणा वादाचा केंद्रस्थानी पहायला मिळत असतो,असाच प्रकार आज लालबागच्या राज्याच्या मंडपाच्या जवळ घडला आहे.याठिकाणी बंदोबस्त कामी आलेल्या पोलीस निरीक्षक संजय निकम यांनी कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन करीत,तोंडाला मास्क न लावता, पत्रकारांना धक्काबुक्की केली आहे. यावेळी उपस्थित पत्रकारांनी त्यांना संयमाने वागण्याची विनंती केली,त्यावर पोलीस निरीक्षक संजय कदम यांनी आता हात नाही तर पाय सुद्धा लावतो, अशा उर्मट भाषेत बोलून नव्या वादाला तोंड फोडलं आहे.या प्रकारावर भाजपचे आमदार तथा विधानपरिषद विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी तीव्र शब्दात या घटनेचा निषेध करीत, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या प्रकाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे.मुबंईतील परळ भागात येत असलेल्या लालबागच्या राजाच्या मंडपात घडलेल्या या घटनेमुळे महाराष्ट्र पोलीस दलाच्या कार्यप्रणालीवर प्रश्न उपस्थित झाला असून,या घटनेला जबाबदार असलेले पोलीस निरीक्षक संजय निकम यांच्यावर गृह विभाग काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.